माजी आमदार इंगळेंची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी

By Admin | Updated: October 20, 2016 20:38 IST2016-10-20T20:38:41+5:302016-10-20T20:38:41+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हास्तरावरील नेत्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून सन्मान व योग्य स्थान मिळत नसल्याचा आरोप करीत प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

Former MLA Ingle NCP quit the party | माजी आमदार इंगळेंची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी

माजी आमदार इंगळेंची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी

जळगाव जामोद

बुलडाणा, दि. २० : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हास्तरावरील नेत्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून सन्मान व योग्य स्थान मिळत नसल्याचा आरोप करीत माजी आमदार कृष्णराव इंगळे यांनी राकाँच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अन्य कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश न घेता त्यांनी तुर्तास राजकीय संन्यास घेत सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्याची इच्छा प्रदर्शित केली.

राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे सुचित करताना डॉ.शिंगणे यांच्या कार्यपध्दतीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत राकाँ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून झालेल्या त्रासाचा उल्लेखही त्यांनी या पत्रात केला आहे. जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या नियुक्त्या करताना आपणाला विश्वासात घेतले नाही असे कृष्णराव इंगळे यांचे म्हणणे आहे. हा राजीनामा देतांना त्यांनी शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्याबद्दल मात्र कृतज्ञता व्यक्त करीत ते माझे आदर्श आहेत असे पत्रात नमूद केले आहे.

Web Title: Former MLA Ingle NCP quit the party