माजी आमदार बी. एस. पाटील आयसीयूमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 07:12 AM2019-04-12T07:12:11+5:302019-04-12T07:12:15+5:30

भाजप जिल्हाध्यक्षाला अटक व सुटका

Former MLA B. S. Patil in ICU | माजी आमदार बी. एस. पाटील आयसीयूमध्ये

माजी आमदार बी. एस. पाटील आयसीयूमध्ये

Next

अमळनेर : येथील मेळाव्यात बुधवारी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व समर्थकांकडून मारहाण झालेले माजी आ. डॉ. बी. एस. पाटील यांना धुळ्यात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.

मारहाणीत त्यांचे नाकाचे हाड मोडले असून नाकात रक्ताच्या गुठळ्या झाल्या आहेत. त्यांच्या यकृतालाही सूज आली असून छातीला मुक्का मार लागला आहे. भाजपमधील या राड्याप्रकरणी बुधवारी रात्रीच उदय वाघ यांच्यासह ७ जणांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच मेळाव्यात उदय वाघ व त्यांच्या ६ कार्यकर्त्यांनी डॉ. पाटील यांना जबर मारहाण केल्यानंतर त्यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली.

माजी आमदार डॉ. पाटील व उदय वाघ यांच्यात सुरुवातीपासून वाद आहेत. त्यात स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला पाटील यांनी विरोध केला होता.

Web Title: Former MLA B. S. Patil in ICU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.