माजी आमदार आलुरे गुरुजी यांचं निधन; सोलापूरच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 08:48 AM2021-08-02T08:48:44+5:302021-08-02T08:49:00+5:30

सिद्रामप्पा आलुरे हे १९८० मध्ये काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार झाले होते. त्यांनी शेकापचे तत्कालीन विद्यमान आमदार माणिकराव खपले यांचा १४ हजार ५७९ मतांनी पराभव करून विजय संपादन केला होता.

Former MLA Alure Guruji passes away; He breathed his last at a hospital in Solapur | माजी आमदार आलुरे गुरुजी यांचं निधन; सोलापूरच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

माजी आमदार आलुरे गुरुजी यांचं निधन; सोलापूरच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

googlenewsNext

अणदूर (जि. उस्मानाबाद) : तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार, शिक्षण प्रसारक मंडळ अणदूरचे संस्थापक सचिव सि.ना.आलुरे गुरूजी यांचे सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील एका रुगणालयात उपचार सुरू असताना निधन झाले. आज दुपारी तीन नंतर त्यांच्या पार्थिवावर अणदूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सिद्रामप्पा आलुरे हे १९८० मध्ये काँग्रेस पक्षाकडून सर्वप्रथम आमदार झाले होते. त्यांनी शेकापचे तत्कालीन विद्यमान आमदार माणिकराव खपले यांचा १४ हजार ५७९ मतांनी पराभव करून विजय संपादन केला होता. या निवडणुकीत आलुरे गुरुजी यांना ३४ हजार १२१ तर खपले यांना १९  हजार ५४२ मते पडली होती. १९८५ ला मात्र शेकापचे माणिकराव खपले पुन्हा एकदा निवडून आले होते. त्यांनी आलुरे  गुरुजी यांचा जवळपास ११ हजार २३० मतांनी पराभव केला. तेव्हा खपले यांना ४२ हजार ५५३ तर काँग्रेसचे आलुरे गुरुजी यांना ३१ हजार ३२३ मते मिळाली होती.

Web Title: Former MLA Alure Guruji passes away; He breathed his last at a hospital in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.