माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत छाजेड यांचे निधन

By Admin | Updated: January 13, 2017 09:58 IST2017-01-13T08:41:20+5:302017-01-13T09:58:50+5:30

पुण्याचे माजी महापौर आणि माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत छाजेड यांचे अल्प आजाराने निधन झाले.

Former minister and senior Congress leader Chandrakant Chhajed passed away | माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत छाजेड यांचे निधन

माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत छाजेड यांचे निधन

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १३ - पुण्याचे माजी महापौर आणि माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत छाजेड यांचे अल्प आजाराने निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. आज दुपारी तीन वाजता बोपोडी स्मशानभुमीत  त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
छाजेड हे राजकीय क्षेत्रात मामु या नावाने ओळखले जात. काँग्रेस पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि अफाट लोकसंग्रहामुले ते पाच वेळा महापालिकेवर निवडून आले होते. त्यांनी महापौर पद भूषवले होते, तसेच सभागृह नेता म्हणूनही त्यांनी महापालिकेत आपला ठसा उमटवला होता. सर्वांना सोबत घेऊन सभागृहात विषय मंजूर करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. 1999 साली विधानसभा निवडणुकीत बोपोडी येथून ते विजयी झाले होते. आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद भूषविण्याची संधी मिळाली.

Web Title: Former minister and senior Congress leader Chandrakant Chhajed passed away