माजी क्रिकेटपटूने लिएंडर पेसला धमकावले
By Admin | Updated: October 17, 2014 18:02 IST2014-10-17T18:02:03+5:302014-10-17T18:02:15+5:30
भारताचा ख्यातनाम टेनिसपटू लिएंडर पेसला एका माजी क्रिकेटपटूने जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पेसने मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

माजी क्रिकेटपटूने लिएंडर पेसला धमकावले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - भारताचा ख्यातनाम टेनिसपटू लिएंडर पेसला एका माजी क्रिकेटपटूने जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पेसने मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
लिएंडर पेस व त्याची लिव्ह इन पार्टनर रिहा पिल्लई यांच्यामध्ये वाद सुरु आहे. हे दोघे सध्या विभक्त झाले असले तरी या दोघांना आठ वर्षाची मुलगी आहे. तिच्यावरुन हा वाद सुरु आहे. सध्या हे प्रकरण कोर्टापर्यंत गेले आहे. १० ऑक्टोबर रोजी माजी क्रिकेटपटू अतूल शर्माने पेसला कोर्टाच्या आवारातच धर्मकावल्याचे पेसने त्याच्या तक्रारीत म्हटले आहे.
अतूल शर्मा आणि रिहा पिल्लई हे दोघे सध्या रिलेशनशिपमध्ये असून याचे पुरावे कोर्टासमोर सादर करणार होतो. मात्र असे केल्यास मला व माझ्या आठ वर्षाच्या मुलीला याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील अशी धमकी अतूल शर्माने दिल्याचे पेसने नमूद केले आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अतूल शर्माविरोधात गुन्हा दाखल केला असून चौकशीनंतरच अटकेची कारवाई केली जाईल असे पोलिस अधिका-यांनी म्हटले आहे.