शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
2
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
3
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
4
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
5
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
6
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
7
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
8
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
9
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
10
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
11
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
12
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
13
जॉन अब्राहमच्या 'फोर्स ३'मध्ये साउथच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची झाली एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?
14
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
15
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
16
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
17
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
18
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

जेव्हा स्वत:ला राजा दाखवण्यासाठी...; अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 10:36 IST

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांवर केली टीका.

ठळक मुद्देअमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांवर केली टीका.

 केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर काल दिवसभर राज्यभर शिवसेनेकडून आंदोलनं आणि निदर्शनं झाली. यात राणेंना अटक झाली आणि रात्री उशिरा त्यांची जामीनावर सुटका झाली. दरम्यान, या प्रकरणी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं. या कारवाई प्रकरणी भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि कारवाईचा निषेधही केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली.  "जेव्हा कोणतीही व्यक्ती स्वत:ला राजा दाखवण्यासाठी धडपडत असते तेव्हा तो खरा राजा नसतो," अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी टीकेचे बाण सोडले आहेत. महाविकास आघाडीवर यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी सातत्यानं टीका केली आहे. नारायण राणे यांच्यावरील कारवाईनंतर भाजपचे अनेत नेतेही आक्रमक होताना दिसत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेवर निशाणा साधला होता.

युवासैनिकांना शाबासकीमुंबईत जुहू येथे नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर युवासैनिकांनी केलेल्या आंदोलनानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. याठिकाणी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात युवासैनिकांनी जोरदार आंदोलन केलं. यात राणे समर्थक आणि युवासैनिकांमध्ये राडाही झाला. पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता. 

आमदार नितेश राणे यांचं आव्हान स्वीकारुन वरुण सरदेसाई कार्यकर्त्यांसह राणेंच्या बंगल्याबाहेर जाऊन घोषणाबाजी करत होते. यात पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान काही कार्यकर्ते देखील जखमी झाले होते. दरम्यान, युवासेनेच्या याच कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची रात्री उशिरा भेट घेतली. वरुण देसाईंच्या नेतृत्त्वात युवा सेनेच्या मुंबई कार्यकारिणीने उद्धव ठाकरे यांची 'वर्षा' येथे भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना स्टाईल आंदोलन केलेल्या युवासैनिकांचं पाठ थोपटून कौतुक केल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे BJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे