शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
2
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
3
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
6
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
7
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
8
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
9
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
10
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
11
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
12
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
13
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
14
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
15
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
16
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
17
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
18
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
19
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं निधन; दोनच दिवसांपूर्वी कोरोनावर केली होती मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2020 08:29 IST

16 जुलै रोजी निलंगेकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ९१ वर्षीय डॉ. निलंगेकर हे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.

पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये निधन झाले. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती. 

16 जुलै रोजी निलंगेकर यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ९१ वर्षीय डॉ. निलंगेकर हे एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कफ वगळता कोरोनाची इतर लक्षणे नव्हती. वय, मधुमेह लक्षात घेता अधिक काळजी घेतली जात होती. १४ जुलैला ताप आला होता, त्यानंतर निलंगा येथून त्यांना लातूरला आणले होते. पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले होते.  

 निलंगेकर यांनी या वयातही कोरोनावर यशस्वी मात केली होती. त्यांना रुग्णालयातील नाॅन कोरोना वाॅर्डात दोन दिवसांपूर्वी दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान त्यांचे किडनीच्या विकाराने निधन झाले. आज दुपारी २ वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह निलंगा येथे आणला जाणार असून सायंकाळी ६ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

दरम्यान, माजी मंत्री अनिल राठोड यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 

नऊ महिने होते राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा ०९ फेब्रुवारी १९३१ रोजी निलंगा इथे त्यांचा जन्म  झाला. ते हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक ही होते. एम.ए., एल.एल.बी. पर्यंत त्याचं शिक्षण झालं होतं. दादासाहेब या नावाने ते सर्वांना सुपरिचित होते. राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याचे मंत्रीपदे त्यांनी सांभाळली. त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर राज्याचे दहावे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी टाकली. ०३ जून १९८५ ते ०६ मार्च १९८६ असे नऊ महिन्यासाठी ते राज्याचे मुख्यमंत्री होते. अतिशय शिस्तप्रिय आणि कडक त्यांचा स्वभाव होता. लातूर जिल्हा निर्मिती, औरंगाबाद खंडपीठ निर्मितीसाठी  प्रयत्न केले होते.

 

टॅग्स :Shivajirao Patil Nilangekarशिवाजीराव पाटील निलंगेकरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस