विठ्ठलाच्या रूपात
By Admin | Updated: August 25, 2016 02:43 IST2016-08-25T02:43:01+5:302016-08-25T02:43:01+5:30
सुखकर्ता, दु:खहर्ता, श्री गणराय आता चक्क वैष्णवांच्या घरी पंढरीचा राणा पांडुरंगाच्या रुपात मंगल दर्शन देण्यासाठी सज्ज झाला आहे

विठ्ठलाच्या रूपात
पेण : सुखकर्ता, दु:खहर्ता, श्री गणराय आता चक्क वैष्णवांच्या घरी पंढरीचा राणा पांडुरंगाच्या रुपात मंगल दर्शन देण्यासाठी सज्ज झाला आहे. पांडुरंग श्री विठ्ठलाच्या रुपात पेणच्या गणेशमूर्तिकारांनी गणेशाची मूर्ती साकारली आहे. गणेशभक्तांच्या आवडी निवडीप्रमाणचे रुप सावळे सुंदर अशी कर कटेवर ठेवून विटेवरची ही गणेशमूर्ती भाविकांना पेणच्या सर्वच ठिकाणच्या कार्यशाळेत पहावयास मिळत आहे. तिची मागणीही मोठी असल्याचे मूर्तिकारांचे म्हणणे आहे. ही विठ्ठलाच्या रु पातील मोहक गणेशमूर्ती गणेशभक्तांना भुरळ घालत आहे.
प्रसन्न भावमुद्रेतील विठ्ठलमूर्तीला बाप्पाचं रुपडं देवून पेणच्या मूर्तीकलेतील भक्तिरसाची कला गणेशमूर्तीत साकारली आहे. तो हा विठ्ठल गणेशोत्सवात बाप्पाच्या रुपात भक्तिभावाने पूजला जाणार आहे. हा सावळा विठ्ठल सर्वांच्याच आवडता असून गणेशमूर्तीच्या रु पात आता त्याचे दर्शन होणार आहे. या गणेशमूर्तीला भक्तांकडून पसंती दिली जात असून बुकिंगलाही मागणी वाढली असल्याचे येथील कलाकारांनी सांगितले.(वार्ताहर)
>गणेशमूर्तीला मागणी
श्री क्षेत्र पंढरपूर येथील विठ्ठलाचे माहात्म्य लक्षात घेऊन विठ्ठलाच्या रूपातील गणेशमूर्ती कलाकारांनी साकारली आहे. त्यामुळे तो हा विठ्ठल गणेशोत्सवात बाप्पाच्या रुपात भक्तिभावाने पूजला जाणार आहे. हा सावळा विठ्ठल सर्वांच्याच आवडता असून गणेशमूर्तीच्या रु पात आता त्याचे दर्शन होणार आहे. सुंदर अशा सावळ्या
रु पातील ही मूर्ती लक्ष वेधून घेत आहे.गणपती बाप्पा