वन विभागाची ‘कासव बचाव’ मोहीम
By Admin | Updated: April 12, 2015 00:59 IST2015-04-12T00:59:54+5:302015-04-12T00:59:54+5:30
दापोली वनपरिक्षेत्र उपविभागाने २०११ ते २०१५ या चार वर्षांच्या कालावधीत समुद्री कासव संवर्धन व संरक्षण केंद्राच्या माध्यमातून १६ हजार ६५१ अंडी गोळा केली

वन विभागाची ‘कासव बचाव’ मोहीम
औषधोपचार : सात हजार पिल्लांना समुद्रात सोडले, कासवांचे संवर्धन व संरक्षण करण्याचा हेतू
शिवाजी गोरे ल्ल दापोली
समुद्रकिनाऱ्यावरील कासवांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाने पुढाकार घेतला आहे. दापोली वनपरिक्षेत्र उपविभागाने २०११ ते २०१५ या चार वर्षांच्या कालावधीत समुद्री कासव संवर्धन व संरक्षण केंद्राच्या माध्यमातून १६ हजार ६५१ अंडी गोळा केली असून, त्यातून बाहेर पडलेल्या ७ हजार ७ पिल्लांना सुखरूप समुद्राच्या पाण्यात सोडले आहे.
निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक असलेले हे कासव अलीकडे मात्र दुष्टचक्रात अडकले आहे. कासवांच्या तस्करीचे प्रमाण काही वर्षांत वाढले आहे. त्याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगमुळे कासवांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने पुढाकार घेत कोकण किनारपट्टीवरील कासवांचे संवर्धन करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. वनविभागाने ग्रामस्थांच्या सहकार्याने समुद्री कासव संवर्धन व संरक्षण केंद्र उभे केले आहे.
या मोहिमेला यशसुद्धा येऊ लागले आहे. पाच वर्षा$ंपूर्वी आंजर्ले व वेळास ही दोन संवर्धन केंद्रे होती. किनारपट्टीवरील ग्रामस्थांची मागणी वाढल्याने ही संख्या आता ९ झाली आहे. २००२ ते २०१०पर्यंत चिपळुणातील भाऊ काटदरे यांची सह्याद्री निसर्गमित्र व वनविभाग यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत होता. २०११पासून वनविभागाने ही मोहीम पूर्णपणे हाती घेतली आहे. समुद्रकिनारपट्टीवरील कासवाची अंडी शोधून एकत्र करून संवर्धन केंद्रातील घरट्यात ठेवली जातात. चार वर्षांत १६,६५१ अंडी सापडली. त्यापैकी ७००७ पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले.
किनारपट्टीवरील कासव संवर्धन केंद्रामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण झाली असून, अनेक कासवांचे संवर्धन होत आहे. यापुढे ही मोहीम अधिक गतिमान केली जाईल. स्थानिकांचा सकारात्मक सहभाग असल्यामुळेच ही मोहीम यशस्वी होतेय.
- राजेंद्र पत्की, वनपरिक्षेत्र अधिकारी
कासव संवर्धन व संरक्षण केंद्राचे काम केल्याने महिना ८ हजार रुपये मिळतात. सकाळी, संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारून अंडी गोळा करून संवर्धन केंद्रात ठेवतो.
- अभिजित केळस्कर, आंजर्ले
जन्माच्या ठिकाणीच घालतात अंडी
कासवांचा अधिवास असलेल्या किनारपट्टीवर कासव अंडी घालण्यासाठी येत असल्याचे आढळले आहे. ज्या किनारपट्टीवरील घरट्यातून पिल्ले बाहेर पडली तेथे ते पिल्लू मोठेपणी अंडी घालण्यासाठी येत असल्याचा शोधही लागला आहे. दरवर्षी किंवा २ वर्षांतून एकदा किंवा ३ वर्षांतून दोनदा कासव अंडी घालते. भरती रेषेच्या बाहेर वाळूत खोलवर अंडी घातली जातात. त्यावर पुन्हा वाळू टाकून तो खड्डा बुजवून कासव समुद्रात निघून जाते.
कोकणातील पहिले
केंद्र वेळासला
सन २००२पासून २०१४पर्यंत
१० हजार कासवांच्या पिल्लांना सुखरूप समुद्राच्या पाण्यात सोडणारे वेळास हे राज्यातील पहिले गाव आहे. वेळास किनाऱ्यावर २००२ साली सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने कोकणातील पहिले कासव संवर्धन व संरक्षण केंद्र उभारले.
च्पावसाळ्यात किनाऱ्यावर येणाऱ्या जखमी कासवांवर उपचार करून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी वनविभागाने वेळास व आंजर्ले किनारी हौद बांधले आहेत. जून ते सप्टेंबर या काळात जाळीत अडकून किंवा लाटांनी खडकावर आदळून जखमी कासव किनाऱ्यावर येऊन उपचाराअभावी मरून पडतात. आता मात्र जखमी कासवांवर उपचार होतील.