गोव्यात विदेशी पर्यटकाची आत्महत्या

By Admin | Updated: September 19, 2016 19:34 IST2016-09-19T19:34:03+5:302016-09-19T19:34:03+5:30

उत्तर गोव्यातील प्रसिद्ध अशा हणजूणा येथील किनारी भागातल्या एका गेस्ट हाऊसमध्ये राहणाऱ्या स्वीझरलॅन्ड येथील नागरिकाने हाताच्या नसा कापून आत्महत्या केली आहे.

Foreign Traveler Suicide in Goa | गोव्यात विदेशी पर्यटकाची आत्महत्या

गोव्यात विदेशी पर्यटकाची आत्महत्या

ऑनलाइन लोकमत 

म्हापसा, दि. १९ : उत्तर गोव्यातील प्रसिद्ध अशा हणजूणा येथील किनारी भागातल्या एका गेस्ट हाऊसमध्ये राहणाऱ्या स्वीझरलॅन्ड येथील नागरिकाने हाताच्या नसा कापून आत्महत्या केली आहे. अ‍ॅन्डरसन ए. के. (६३ )  असे त्याचे नाव आहे.  
रविवारी सायंकाळी उशीरा हा प्रकार उघडकीस आला. अ‍ॅन्डरसन यांनी कैचीच्या सहाय्याने आपल्या दोन्ही हाताच्या नसा कापून घेतल्या. अधिक रक्तस्त्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी दुपारी हा वृद्धा या हॉटेलमध्ये वास्तव्यास आला होता. 
सायंकाळी उशीरा अ‍ॅन्डरसन यांनी प्रतिसाद न दिल्याने गेस्ट हाऊसच्या व्यवस्थापकाने अग्निशामक दलास पाचारण केले.

दलाने गेस्ट हाऊसच्या खोलीच्या दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने निदर्शनास आले. तसेच बाजूला कैची पडल्याचे दिसून आले. अग्निशामक दलाने हणजूण पोलिसांना कळवल्यानंतर हणजूण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक योगेश सावंत यांनी पंचनामा केला. अ‍ॅन्डरसन याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही

Web Title: Foreign Traveler Suicide in Goa