मित्रांसोबत सेक्ससाठी पत्नीवर जबरदस्ती, पतीवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: August 26, 2016 14:52 IST2016-08-26T14:52:38+5:302016-08-26T14:52:38+5:30
हडपसर येथील एका महिलेने आपल्या पतीवर इच्छेविरुद्ध सेक्स केल्याचा आरोप केला आहे.

मित्रांसोबत सेक्ससाठी पत्नीवर जबरदस्ती, पतीवर गुन्हा दाखल
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २६ - हडपसर येथील एका महिलेने आपल्या पतीवर इच्छेविरुद्ध सेक्स केल्याचा आरोप केला आहे. महिलेने पतीविरोधात वानवडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
पती आपल्यावर मद्यपानाची सक्ती करायचा तसेच मित्रांबरोबर शरीरसंबंध ठेवायला भाग पाडायचा असा आरोप या महिलेने केला आहे. आपण त्याला विरोध केला तर, जळत्या सिगारेटचे चटके द्यायचा असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदार महिले विरोधात अपशब्द वापरले म्हणून पोलिसांनी आरोपीची आई, भाऊ आणि बहिणी विरोधातही गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी अजून आरोपीला अटक केलेली नाही.