शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींना माफी मागायला भाग पाडा; वीर सावरकरांच्या नातवाची उद्धव ठाकरेंकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 11:57 IST

विरोधकांच्या बैठकीत शरद पवारांनी सावरकरांबाबत जे मत व्यक्त केले ते स्वागतार्ह आहे असंही रणजित सावरकर म्हणाले.

मुंबई - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जो अपमान राहुल गांधींनी केला आहे. त्यासाठी त्यांना माफी मागायला भाग पाडा, अन्यथा तुमच्या बोलण्याला काही अर्थ नाही अशी मागणी वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी केली  आहे. राज्यात सुरू असलेल्या सावरकर वादाच्या मुद्द्यावर सावरकर कुटुंबाने स्पष्ट भूमिका मांडली. 

रणजित सावरकर म्हणाले की, सावरकर यांचा वापर राजकीय फायद्यासाठी राहुल गांधींकडून केला जातोय. सावरकर हिंदुत्ववादी विचारांचे होते त्यांच्यावर आरोप केले तर मुस्लिमांची मते मिळतील असा राहुल गांधींचा समज आहे. एका राष्ट्रभक्ताच्या नावाचा अशाप्रकारे उपयोग होणे गंभीर आहे. काँग्रेससोबत असणारे पक्षही सावरकरांचा वापर करतायेत. बाळासाहेबांनी सावरकर स्मारकासाठी जागा उपलब्ध दिली. मणिशंकर अय्यर यांना जोडे मारले परंतु आज त्यांचा वारसा असणारे आज जी भूमिका घेतायेत ते दुर्दैवी आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच सावरकरांचा आदर बाळगणारे लोक आजही काँग्रेसमध्ये आहेत परंतु ते आवाज उचलत नाही. शिवसेनेत फूट पडल्याचे दु:ख आहे. शिवसेना जी बोटचेपी भूमिका घेत होती त्यावर अनेक शिवसैनिक नाराज होते. आज सावरकरांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडली ती स्वागतार्ह आहे. परंतु ते स्वत: मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या शिदोरी मासिकात अत्यंत आक्षेपार्ह भाषेत सावरकरांवर लिखाण करण्यात आले. यानंतर मी त्यांना पत्र लिहिलं, भेटीची वेळ मागितली. मुख्यमंत्री असताना ते कारवाई करू शकले असते. तेव्हा ती मान्य केली. तुमच्याबाबत सावरकरांबद्दल प्रेम पण कृतीत उतरत नाही तोवर त्याला अर्थ नाही असा टोलाही रणजित सावरकर यांनी लगावला आहे. 

दरम्यान, सावरकरांच्या नावाचा राजकीय फायद्यासाठी दुरुपयोग होत आहे ते दुर्दैवी आहे. जर सावरकरांचा विरोध केला तर भाजपाचा विरोध होईल असा गैरसमज राहुल गांधींचा आहे. मुस्लीमांचे लांगुनचालून करण्याचं राजकारण काँग्रेस करतेय. जो कुणी सावरकरांचा अपमान झाल्यानंतर मैदानात उतरतो त्याला सावरकरवादी मी मानतो. संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या मनात सावरकरांबद्दल प्रेम असू शकते तसे काँग्रेस नेत्यांच्या मनातही आहे. परंतु ते कृतीत दिसत नाही तोवर त्यांचं बोलणं व्यर्थ आहे. काँग्रेस त्यांच्या भूमिकेपासून दूर होत नाही असं रणजित सावरकर म्हणाले. 

शरद पवारांचे मत स्वागतार्ह विरोधकांच्या बैठकीत शरद पवारांनी सावरकरांबाबत जे मत व्यक्त केले ते स्वागतार्ह आहे. १९८९ मध्ये शरद पवारांनी जे भाषण केले होते ते अतिशय योग्य आहे. सावरकरांचा अपमान करू नका म्हणणं आणि त्यांच्या मित्रांकडून सातत्याने अपमानास्पद बोलणे हे सर्व नुराकुस्ती आहे. सावरकरांचा अपमान झाल्याबद्दल राहुल गांधींवर कारवाई होणे गरजेचे आहे. जर खरोखरच सावरकरांबद्दल आदर असेल तर राहुल गांधींकडून माफी मागायला हवं. सावरकरांनी माफी मागितली हे सिद्ध करणारे एकतरी पत्र दाखवावं असं आव्हान रणजित सावरकरांनी राहुल गांधींना केले. 

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेRahul Gandhiराहुल गांधी