शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 14:47 IST

दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्दे बारामती तालुक्यातील जवळपास १५ हजार पशुपालकांना या निर्णयामुळे दिलासामॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन व त्यामुळे चारा उपलब्ध होण्यासाठी कालावधीबारामती तालुक्यात १४ छावण्यांमध्ये १५ हजार जनावरे

बारामती : राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावण्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळात चाराटंचाईने हैराण झालेल्या दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बारामती तालुक्यातील जवळपास १५ हजार पशुपालकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत चारा छावण्या सुरू ठेवण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे त्या भागातील पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेबाबतचा गंभीर प्रश्न नजीकच्या कालावधीत निर्माण होण्याची शक्यता आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी शासन निर्णयान्वये जनावरांच्या चारा छावण्या उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉन्सूनचे उशिरा झालेले आगमन व त्यामुळे चारा उपलब्ध होण्यासाठी कालावधी लागणार आहे. परिणामी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्या ऑगस्टअखेर सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यात अद्याप मॉन्सूनचा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने चारा छावण्यांची मुदत वाढविण्याची मागणी पशुपालक शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. बुधवारी(दि. ३१) चारा छावणीची शेवटची मुदत असल्याने पशुपालक शेतकरी चिंताग्रस्त होते. त्यामुळे चारा छावणीची मुदत पुन्हा वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. राज्यात दुष्काळी भागात जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांची मुदत वाढविण्यात आली आहे.बारामती तालुक्यात १४ छावण्यांमध्ये १५ हजार जनावरे आहेत. बारामती दूध संघ, कृषि उत्पन्न बाजार समिती, माळेगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, बारामती खरेदी विक्री संघ, खंडू खैरेवाडी येथील राजे प्रतिष्ठान, धो.आ. सातव उर्फ कारभारी अण्णा चॅरिटेबल ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तालुक्यात चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत...चारा टंचाईने हैराण झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासाराष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले की, येथील पशुउत्पादक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. शेतकºयांनी याबाबत  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. पवार यांनी राज्य पातळीवर केलेल्या मागणीला यश आले आहे. यापूर्वी देखील जूनअखेर असणारी चारा छावणीची मुदत पवार यांच्या मागणीमुळे वाढवून मिळाल्याचे होळकर म्हणाले. 

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीdroughtदुष्काळState Governmentराज्य सरकार