‘फ्लू’ ठरु शकतो घातक

By Admin | Updated: July 20, 2014 23:29 IST2014-07-20T23:29:18+5:302014-07-20T23:29:18+5:30

हजारोंना लागण : शीतज्वराने पाच वर्षांमध्ये शेकडो रुग्णांचा मृत्यू!

'Flu' can be fatal | ‘फ्लू’ ठरु शकतो घातक

‘फ्लू’ ठरु शकतो घातक

बुलडाणा : थंडी, ताप, हात-पाय दुखणे, खोकला, डोकेदुखी अशी लक्षणे आढळल्यास सावधान. ही लक्षणे शीतज्वर म्हणजेच कॉमन फ्लूची असू शकतात. या आजाराने गत पाच वर्षांमध्ये ९७३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून उजेडात आली आहे. कॉमन फ्लू अर्थात इन्फ्लुएंझा हा पशू, पक्षी आणि मानवामध्ये आढळणारा विषाणूजन्य आजार आहे. या विषाणूच्या ए,बी,सी अशा तीन श्रेणी आहेत. त्यापैकी ह्यएह्ण श्रेणीचा विषाणू मनुष्यासाठी घातक असतो. या विषाणूचा संसर्ग झाल्यास थंडी वाजणे, ताप, स्नायूंचे दुखणे, घसा दुखणे, खोकला, डोकेदुखी, डोळ्यातून पाणी येणे, अंगाला खाज सुटणे ही लक्षणे रुग्णांमध्ये दोन ते तीन दिवसातच दिसू लागतात. राज्य शासनाच्या अहवालानुसार गत पाच वर्षांमध्ये या आजाराच्या ४७ लाख ३0 हजार ४२५ रुग्णांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख १ हजार ८५0 संशयित रुग्ण आढळून आले. तर ८ हजार ३६५ रुग्ण या आजाराने बाधित असल्याचे निष्पन्न झाले. योग्यवेळी उपचार न घेतल्याने ९७३ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Web Title: 'Flu' can be fatal