शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

पंढरपुरात पूर लागला ओसरू; वाढू लागली दलदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2019 10:57 AM

रोगराई रोखण्याचे आव्हान : विस्थापितांना मोफत धान्यांचे वाटप

ठळक मुद्देउजनी व वीरभाटघर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला महापूरपुराचे पाणी शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, संत पेठ, कोळी गल्ली, कुंभार गल्ली आदी भागात शिरलेकाही अर्धी गावे पुराच्या पाण्यात असल्याने तेथील शेकडो कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले

पंढरपूर : उजनी व वीर भाटघर धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीला आलेला पूर दोन दिवसांनंतर ओसरू लागला आहे. त्यामुळे पुरात बुडालेली अनेक घरे रिकामी होत आहेत. ज्या गावांचा संपर्क तुटला होता त्या गावांचा संपर्क होत आहे. मात्र पुरामुळे अनेक घरांमध्ये चिखलसदृश परिस्थिती, उग्र वास असल्याने रोगराई रोखण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे. पुरामुळे विस्थापित झालेल्यांना प्रशासनाकडून १० किलो गहू व १० किलो तांदळाचे वाटप करून दिलासा देण्यात येत  आहे.

उजनी व वीरभाटघर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे भीमा नदीला महापूर आला होता. या पुराचे पाणी शहरातील व्यासनारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, संत पेठ, कोळी गल्ली, कुंभार गल्ली आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरले होते़ तसेच तालुक्यातील आव्हे, तरटगाव, पटवर्धन कुरोली, देवडे, खेडभाळवणी, खेडभोसे, व्होळे, गुरसाळे,  चिंचोली भोसे, भटुंबरे, कौठाळी, शिरढोण, शेळवे, पिराची कुरोली, खळवे, वाखरी, पंढरपूर, गोपाळपूर, देगाव, अजनसोंड, सुस्ते, मुंढेवाडी, चळे, सरकोली या गावांना पुराचा तडाखा बसला होता. यामधील अनेक गावांना पुराने वेढा दिल्याने गावांचा संपर्क तुटला होता.

 काही अर्धी गावे पुराच्या पाण्यात असल्याने तेथील शेकडो कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले होते. या पुरामुळे शेकडो हेक्टर ऊस शेतीचे कोट्यवधी  रुपयांचे नुकसान झाले होते. तीन दिवसांनंतर आता पूर ओसरू लागला आहे. 

गावांचा संपर्क होऊ लागलापुराच्या पाण्याने वेढा दिल्याने पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, देवडे, शेळवे, खेडभोसे, चिंचोली भोसे, शिरढोण, कौठाळी, भटुंबरे, सुस्ते, अजनसोंड आदी गावांचा संपर्क तुटला होता. गावाला जोडणाºया सर्व रस्त्यांवर पाणी असल्याने गावातील नागरिकांना बाहेर व बाहेरच्या नागरिकांना गावात जाता येत नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र आता तीन दिवसांनंतर पुराचे पाणी ओसरल्याने गावांना जोडणारे रस्तेही उघडे होत आहेत.

घरांमध्ये सर्वत्र चिखलच चिखल- भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील व तालुक्यातील अनेक गावातील आठ हजारांपेक्षा जास्त घरे पाण्यात गेली होती. आता पूर ओसरल्यानंतर ही घरे उघडी होत आहेत. घरात पुराचे पाणी शिरल्याने त्या ठिकाणी दलदल निर्माण झाली आहे. त्यामुळे चिखलसदृश परिस्थिती, उग्र वास, जलचर प्राण्यांचे दर्शन होत असल्याने रोगराई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. ही रोगराई रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे खास पथके नेमून जंतुनाशक पावडरची फवारणी, लसीकरण व आपद्ग्रस्त नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मोहीम उघडावी, असे बोलले जात आहे़

टॅग्स :SolapurसोलापूरfloodपूरPandharpurपंढरपूरwater transportजलवाहतूकUjine Damउजनी धरण