नांदेडमध्ये आसना नदीला मोठा पूर, अनेक लोक अडकले
By Admin | Updated: June 30, 2016 12:34 IST2016-06-30T12:34:41+5:302016-06-30T12:34:42+5:30
वसमत तालुक्यातील रात्रीच्या पावसाने नांदेड शहराजवळील आसना नदीच्या पात्रात पाणी वाढल्याने मोठा पूर आला असून अनेक नागरिक अडकले.

नांदेडमध्ये आसना नदीला मोठा पूर, अनेक लोक अडकले
>ऑनलाइन लोकमत
नांदेड, दि. ३० - वसमत तालुक्यातील रात्रीच्या पावसाने नांदेड शहराजवळील आसना नदीच्या पात्रात पाणी वाढल्याने मोठा पूर आला असून अनेक नागरिक अडकले आहेत. तसेच पंप हाऊसवर पाच कर्मचारी अडकले असून त्यांना लवकरच सुखरूप बाहेर काढले जाईल, असे प्रशासनाने सांगितले.
दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात किनोला, आंबा, सेलू, कुरुंदा गावातही बुधवारी रात्री पावसाने कहर केला असून पाण्यामुळे किनोला भागातील २०००हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.