शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 20:27 IST

Raj Thackeray In Dombivli : "ज्या शिवछत्रपतींनी एवढे राज्य उभे केले, एवढा मान उभा केला, अटकेपार झेंडे फडकावले आपल्या मराठे शाहीने. हा इतिहास सांगणारा आमचा महाराष्ट्र आणि आम्ही व्यासपीठावर मुली नाचवतोय?"

मला, आज आत्ताच कुणीतरी एक क्लिप पाठवली. मुख्यमंत्र्यांच्या आत्ताच्या सभेच्या व्यासपीठावर एका भोजपुरी गाण्यावर बाई नाचतेय. लोक येण्याआधी आणि लोकांचे मनोरंजन व्हावे म्हणून एक बाई नाचतेय. तेही कुठल्यातरी भोजपुरी गाण्यावर नाचतेय. ज्या व्यासपीठावर एकनाथ शिंदेंचा फोटो आहे, संबंधित उमेदवाराचं नाव आहे, त्यावर एक महिला भोजपुरी गाण्यावर नाचतेय. ही लाडकी बहीण योजना? असा सवाल करत, ज्या शिवछत्रपतींनी एवढे राज्य उभे केले, एवढा मान उभा केला, अटकेपार झेंडे फडकावले आपल्या मराठे शाहीने. हा इतिहास सांगणारा आमचा महाराष्ट्र आणि आम्ही व्यासपीठावर मुली नाचवतोय? अशा शब्दात आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ते डोंबिवलीत राजू पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत बोलत होते.

राज ठाकरे पुढे म्हणाले, "आपण कुठे चाललो आहोत. या असल्या प्रकारच्या व्यासपीठावर, अशा प्रकारच्या मुली आणून, अशा प्रकारच्या गाण्यांवर नाचवायची पद्धत, हे सर्व युपी, बिहार, त्या बाजूला. हे आपल्याकडे कधीच नव्हतं. हे आपल्याकडे सुरू झालं आता. आपल्याकडच्या राजकीय व्यासपीठांवर, अशा प्रकारे मुली नाचवायला आणायला लागलो आता. मला वाटतं, यात एकनाथ शिंदे यांनी वैयक्तीक लक्ष घालायला हवे. हे कुणाचे डोके आहे? आहे? म्हातारी मेल्याचं दुःनाही काळ सोकावतो." 

...अन् आम्ही व्यासपीठावर मुली नाचवतोय -"आपल्यासाठी, या असल्या घाणेरड्या राजकारणातून महाराष्ट्र वाचवणे सर्वात महत्वाचे आहे. शिवसेना असूदेत, राष्ट्रवादी काँग्रेस असूदेत, भाजपा असूदेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेना असूदेत, या सर्वांपेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. कुठला पक्ष टिकला, नाही टीकला, काही फरक पडत नाही. महाराष्ट्र टिकायला हवा. महाराष्ट्र बरबाद होता कामा नये. जर महाराष्ट्र बरबाद झाला, तर यांचं नाव नाही घेता येणार आपल्याला. ज्या शिवछत्रपतींनी एवढे राज्य उभे केले, एवढा मान उभा केला, अटकेपार झेंडे फडकावले आपल्या मराठे शाहीने, हा इतिहास सांगणारा आमचा महाराष्ट्र आम्ही व्यासपीठावर मुली नाचवतोय..." असे म्हणत राज ठारे यांनी संताप व्यक्त केला.

...म्हणून एकदा तुम्ही माझ्या हाती सत्ता देऊन बघा -महाराष्ट्रातील एवढे सारे प्रश्न प्रलंबित असताना, चेष्टा चालू आहे, थट्टा चालू आहे, मस्करी चालू आहे, मजा चालू आहे. आज मी सहज तुम्हाला हलवायला आलो होतो की, जागे आहातना, जिवंत आहातना. येथे माझी पुन्हा एकदा 15 तारखेला सभा आहे. तेव्हा इतरही गोष्टींवर बोलेनच. बाबानो तुम्हाला माझे एवढेच सांगणे आहे की, महाराष्ट्रासाठी जागे रहा, जिवंत राहा. मी या महाराष्ट्रासाठी तळमळीने काम करतोय. मी माझ्या पहिल्या सभेत सांगतिले होते की, जगाला हेवा वाटावा, असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा एवढीच इच्छा आहे. म्हणून माझ्या हाती तुम्ही एकदा सत्ता देऊन बघा. या इच्छेपोटीच मी ही निवडणूक लढवतोय, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेRaju Patilराजू पाटीलMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना