पाच वर्षीय मुलीने गिळले जिवंत काडतूस

By Admin | Updated: June 11, 2014 10:48 IST2014-06-11T10:48:34+5:302014-06-11T10:48:59+5:30

ठाण्यात एका ५ वर्षीय मुलीने जिवंत काडतुसे गिळल्याची घटना घडली आहे.

A five-year-old girl who lives with live cartridge | पाच वर्षीय मुलीने गिळले जिवंत काडतूस

पाच वर्षीय मुलीने गिळले जिवंत काडतूस

>ठाणे : लोकमान्य नगर भागात एक पाच वर्षीय मुलगी खेळत असताना, तिला मिळालेली जिवंत काडतुसे तिने गिळल्याची घटना घडली. त्यानंतर तिच्या पोटात दुखू लागल्याने तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. नैसर्गिक विधीतून ही काडतुसे बाहेर आली आहेत. 
येथील लोकमान्य पाडा नं. ४ भागात किशोरी ऐलमरकर ही मुलगी राहत असून हा परिसर येऊरच्या लष्करी गोळीबार श्रेणीच्या जवळ आहे. किशोरीची आई धुणी भांडीची कामे करत असून वडिल खाजगी शिकवणी वर्गामध्ये शिपाई म्हणून काम करतात. रविवारी संध्याकाळी आठच्या सुमारास आई घरात जेवण बनवत असतांना किशोरी तिचा मोठा भाऊ सुशांत व अन्य दोन मुले घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी त्यामुलीला एका ठिकाणी दोन जिवंत काडतुसे सापडली. पैकी एक मुलीने गिळले. त्यानंतर किशोरीला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तत्काळ तिचे एक्सरे काढले. त्यावेळी तिच्या पोटातील काडतुस दिसून आले. तिला औषधे देऊन ही बुलेट नैसर्गिक विधीच्या माध्यमातून बाहेर पडण्यासाठी वाट पाहत होते. डॉ. सुरेश ठाकुर यांच्या देखरेखी खाली तिच्यावर उपचार सुरु होते.  नैसर्गिक विधीतून ही काडतुस बाहेर पडली. (वार्ताहर)
 

Web Title: A five-year-old girl who lives with live cartridge