धरणात बुडून पाच महिलांचा मृत्यू
By Admin | Updated: January 23, 2016 20:39 IST2016-01-23T20:39:59+5:302016-01-23T20:39:59+5:30
कपडे धुण्यासाठी अंजनी धरणावर गेलेल्या काठेवाडी कुटुंबातील 15 वर्षीय मुलीसह पाच महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी भगतवाडीजवळ घडली.

धरणात बुडून पाच महिलांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
एरंडोल, (जि. जऴगाव) दि. २३ - कपडे धुण्यासाठी अंजनी धरणावर गेलेल्या काठेवाडी कुटुंबातील 15 वर्षीय मुलीसह पाच महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी भगतवाडीजवळ घडली.
गरोदर असलेल्या वनीबाई पाण्यात पडल्यानंतर त्यांना दुपट्टा फेकून वाचविण्याच्या प्रयत्नात पाचही जणींना जीव गमवावा लागला. भुरीबाई भरवाड (35), मनुबाई भरवाड (30), वनीबाई भरवाड (25), अनुबाई भरवाड (22), लक्ष्मीबाई भरवाड (15) अशी या दुर्देवी महिलांची नावे आहेत. एरंडोल-कासोदा रस्त्याजवळ भगतवाडी परिसरात चार भावंडांचे काठेवाडी कुटुंब 22 ते 25 वर्षापासून वास्तव्य करीत आहे.
पाण्यातील ताडपत्री काढण्यासाठी वनीबाई पाण्यात उतरल्यानंतर त्यांचा तोल गेला. काठावरच्या महिलांनी त्यांना वाचविण्याचा अपयशी प्रयत्न केला.