कारच्या धडकेत पाच वाहनांचे नुकसान

By Admin | Updated: February 14, 2017 03:45 IST2017-02-14T03:45:28+5:302017-02-14T03:45:28+5:30

प्रभादेवी परिसरात कारच्या धडकेत पाच वाहनांचे नुकसान झाल्याची घटना घडली. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून, दादर पोलीस अधिक तपास

Five vehicles lost in the car | कारच्या धडकेत पाच वाहनांचे नुकसान

कारच्या धडकेत पाच वाहनांचे नुकसान

मुंबई : प्रभादेवी परिसरात कारच्या धडकेत पाच वाहनांचे नुकसान झाल्याची घटना घडली. यामध्ये कोणीही जखमी झाले नसून, दादर पोलीस अधिक तपास करत आहेत.
दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री बाराच्या सुमारास ही घटना घडली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. त्यातच त्याच्या पाठीमागे असलेल्या पाच वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच दादर पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी चालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी अपघाताची नोंद करत अधिक तपास सुरू असल्याची माहिती दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शांतिलाल जाधव यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Five vehicles lost in the car