गर्भवती महिला पोलिसांना पाच हजारांचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 03:32 IST2018-03-01T03:32:41+5:302018-03-01T03:32:41+5:30

महिला सक्षमीकरण व बेटी बचावसाठी आता महाराष्टÑ पोलीस दलानेही पुढाकार घेतला आहे. गरोदरपणात महिला पोलिसांना विशेष पोषण आहार मिळावा,

 Five thousand grant for pregnant women police | गर्भवती महिला पोलिसांना पाच हजारांचे अनुदान

गर्भवती महिला पोलिसांना पाच हजारांचे अनुदान

राजेश निस्ताने
यवतमाळ : महिला सक्षमीकरण व बेटी बचावसाठी आता महाराष्ट्र पोलीस दलानेही पुढाकार घेतला आहे. गरोदरपणात महिला पोलिसांना विशेष पोषण आहार मिळावा, म्हणून पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी २३ फेब्रुवारी रोजी या संबंधीचा आदेश जारी केला. महिला पोलीस कर्मचा-यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देण्याच्यादृष्टीने गरोदरपणात पोषण आहारासाठी शिपाई ते निरीक्षक पदावरील कर्मचा-यांना पाच हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे.

Web Title:  Five thousand grant for pregnant women police

टॅग्स :Policeपोलिस