महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक; नऊ हजार जणांना रोजगार 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2021 08:51 AM2021-12-08T08:51:08+5:302021-12-08T08:51:21+5:30

मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या उपक्रमांतर्गत एकूण १.८८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून ३ लाख ३४ हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करण्यात राज्य यशस्वी ठरल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.

Five thousand crore investment in Maharashtra; Employs nine thousand people | महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक; नऊ हजार जणांना रोजगार 

महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक; नऊ हजार जणांना रोजगार 

Next

मुंबई : दुबई वर्ल्ड एक्स्पोच्या यशानंतर उद्योग विभागाने गुंतवणूकदारांना आकर्षित करताना मंगळवारी विविध १२ कंपन्यांसोबत तब्बल सुमारे ५,०५१ हजार कोटींचे सामंजस्य करार केले. या १२ सामंजस्य करारातून राज्यात ९ हजार पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंग, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन व विविध कंपन्यांचे उद्योजक यावेळी उपस्थित होते. मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० या उपक्रमांतर्गत एकूण १.८८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून ३ लाख ३४ हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करण्यात राज्य यशस्वी ठरल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.

मंगळवारी झालेल्या करारातून संरक्षण, अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान, जैव-इंधन, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती, निर्यात प्रधान उद्योग, अन्न प्रक्रिया, स्टील, इथेनॉल, औषध निर्माण आदी क्षेत्राला चालना मिळणार आहे. 

Web Title: Five thousand crore investment in Maharashtra; Employs nine thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.