धुळ्यात घराला आग लागून 5 जणांचा मृत्यू

By Admin | Updated: March 26, 2017 09:21 IST2017-03-26T06:09:02+5:302017-03-26T09:21:32+5:30

धुळ्यात एका घराला आग लागून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला

Five people die in a fire in Dhule house | धुळ्यात घराला आग लागून 5 जणांचा मृत्यू

धुळ्यात घराला आग लागून 5 जणांचा मृत्यू

 ऑनलाइन लोकमत

धुळे, दि. 26 -  धुळ्यात मध्यरात्री एका घराला अचानक आग लागून एकाच कुटुंबातील 5 जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. धुळे शहरातील अकबर चौकातील धना डाळ बोळीतील ही घटना आहे. येथील तीन मजली जुन्या घराला रात्री 3 वाजेच्या सुमारास आग लागलेल्या या भीषण आगीत हे पाच जण अडकले.  आगीतून बाहेर पडता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

राम शर्मा यांच्या घराला लागलेल्या आगीत त्यांच्यासह कुंटुंबातील इतर चार जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये राम शर्मा यांच्या आई, पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. रात्री 3 वाजेच्या सुमारास ही आग लागली होती.
 
आग लागल्यानंतर जवळपास एक तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. तोपर्यंत घरात अडकून पडलेल्या पाचही जणांचा गुदमरुन मृत्यू झाला होता. या दुमजली घरातील पहिल्या मजल्याला आग लागली. मात्र दुसऱ्या मजल्यावर झोपेत असलेल्या पाच जणांना बाहेर पडता न आल्याने ही घटना घडली.
 
या घटनेनंतर परिसरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण धुळे शहरावर शोककळा पसरली आहे.
 
आगीत मृत झालेल्या व्यक्तींची नावे :
 
शोभाबाई छाजुलाल शर्मा (62)
 
राम शर्मा (45)
 
जयश्री राम शर्मा (35)
 
साई राम शर्मा (12)
 
राधे राम शर्मा (10)
 
 

Web Title: Five people die in a fire in Dhule house