पाच लाख नागरिकांना टँकरने पाणी

By Admin | Updated: June 4, 2014 22:18 IST2014-06-04T22:11:39+5:302014-06-04T22:18:03+5:30

सोलापूर या जिल्‘ातील २८९ गावातील १ हजार १७३ वाड्यावस्तीतील ५ लाख १५ हजार ७२८ नागरिकांना २३६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

Five lakh people water tankers | पाच लाख नागरिकांना टँकरने पाणी

पाच लाख नागरिकांना टँकरने पाणी

पुणे : उन्हाच्या झळांमुळे पुणे विभागातील पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली असून, पुणे, सांगली आणि सोलापूर या जिल्‘ातील २८९ गावातील १ हजार १७३ वाड्यावस्तीतील ५ लाख १५ हजार ७२८ नागरिकांना २३६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईतून सुटकेसाठी बळीराजा आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.
गेल्या वर्षी पुणे विभागात पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच परतीचा पाऊसही जोरदार झाला होता. प्रशासनाने २०१२ सालच्या दुष्काळाच्या पार्वभूमीवर जलयुक्त अभियानाची कामे सुरू केली होती. त्या अंतर्गत २ हजार १६ जुन्या सिमेंट नाल्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. तर ३७६ कोल्हापूर साठवण बंधारे, ६ हजार ४०० समतल चर, १ हजार १९२ शेततळे, २ हजार ३८६ नवीन साखळी बंधारे व ४ हजार ८२३ विहिरींच्या पुनर्भरणाची कामे करण्यात आली होती. विभागात झालेला समाधानकारक पाऊस व जलयुक्त अभियानांच्या कामांमुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. परिणामी आज अखेर विभागात एकही चारा छावणी उभारावी लागली नाही.
याबाबत पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाताली अधिकारी म्हणाले, गेल्या वर्षर्ी या काळात विभागातील १ हजार १२० गावातील २६ लाख ८८ हजार ३५६ नागरिकांना १ाहजार ४६८ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. जलयुक्त अभियानामुळे दुष्काळावर मात करण्यास मदत झाली आहे. मात्र अजूनही काही गावांत पाणी टंचाईची समस्या कायम आहे.

Web Title: Five lakh people water tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.