पाच लाख भाविकांनी घेतले शनीदर्शन

By Admin | Updated: November 23, 2014 02:18 IST2014-11-23T02:18:09+5:302014-11-23T02:18:09+5:30

श्री क्षेत्र शनीशिंगणापूर येथे शनी अमावस्येनिमित्त भरलेल्या यात्रेत जवळपास 5 लाख भाविकांनी स्वयंभू शनी मूर्तीचे दर्शन घेतले.

Five lakh devotees took Shaniyadarshan | पाच लाख भाविकांनी घेतले शनीदर्शन

पाच लाख भाविकांनी घेतले शनीदर्शन

सोनई (जि. अहमदनगर) : श्री क्षेत्र शनीशिंगणापूर येथे शनी अमावस्येनिमित्त भरलेल्या यात्रेत जवळपास 5 लाख भाविकांनी स्वयंभू शनी मूर्तीचे दर्शन घेतले. 
21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजून 42 मिनिटांनी अमावास्येस प्रारंभ झाला. 22 नोव्हेंबर कार्तिक अमावास्या शनी अमावास्येचा पर्वकाल सायंकाळी 6 वाजून 2 मिनिटांर्पयत होता. शुक्रवार सायंकाळपासूनच भाविक शनीशिंगणापूरकडे दर्शनासाठी येत होते. काहींनी मध्यरात्री 12 नंतर शनीदर्शन घेतले. दिवसभर दिल्ली, मुंबई, सुरत, हरियाना येथील शनीभक्त मंडळांनी खिचडी, प्रसाद, लाडू इत्यादीचा महाप्रसाद मोफत वाटप केला. देवस्थान ट्रस्टचे वतीने जागोजागी पिण्याचे पाण्याचे टँकर्स, शनैश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकांत वैद्यकीय पथके भाविकांचे सेवेसाठी उपलब्ध होती. एस.टी. महामंडळाचे वतीने यात्र विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आलेली होती. (वार्ताहर)

 

Web Title: Five lakh devotees took Shaniyadarshan