मच्छिमारांचे समुद्रात आंदोलन

By Admin | Updated: May 30, 2015 00:08 IST2015-05-29T22:58:46+5:302015-05-30T00:08:13+5:30

'जैतापूर'ला विरोध : ८० बोटी सहभागी; पोलिसांचा बंदोबस्त

Fishermen's movement in the sea | मच्छिमारांचे समुद्रात आंदोलन

मच्छिमारांचे समुद्रात आंदोलन

जैतापूर : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पस्थळी माडबन समुद्रामध्ये शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास नाटे येथील सर्व मच्छिमारांनी आपापल्या यांत्रिक नौका घेऊन आंदोलन केले.
या आंदोलनाला नाटे डुंगेरी जेटीपासून सुरुवात झाली. डुंगेरी जेटीपासून थेट लाईट हाऊस प्रकल्पस्थळ माडबन याठिकाणी या सर्व बोटी नेण्यात आल्या. त्या ठिकाणी समुुद्रात मोठमोठ्या घोषणा देण्यात आल्या. शुक्रवार असल्याने नाटे भागातील सर्व मुस्लिम बांधव आपला व्यवसाय बंद ठेवतात. अणुऊर्जा प्रकल्पामुळे मासे मिळणार नाहीत आणि मच्छिमारांवर उपासमारीची वेळ येईल, असा आक्षेप घेत सर्व मच्छिमारांनी सुमारे ७० ते ८० बोटींमधून आंदोलन केले.
जवळजवळ दोन तास हे आंदोलन सुरू होते. सागरी पोलीस ठाणे नाटे यांच्यामार्फ त स्ट्रायकिंग फोर्सचे १५० पोलीस, अत्याधुनिक हत्यारबंद सागर शांती आणि रत्नागिरी अशा दोन बोटी तैनात ठेवण्यात आल्या होत्या.रत्नागिरी मुख्यालय, राजापूर, लांजा, देवरुख आदी भागातून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. (वार्ताहर)
शिवसेना पदाधिकारी गैरहजर
शिवसेनेचे राजापूरचे आमदार किंवा शिवसेना पदाधिकारी मात्र या आंदोलनात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे या आंदोलनात शिवसेना सामील आहे की नाही, याबाबत चर्चा सुरू होती.

Web Title: Fishermen's movement in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.