शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मासे वाहतूक करणारा ट्रक पलटला; मदत सोडून लोकांनी पळवले मासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 19:08 IST

मासे घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर झाला होता पलटी. शनिवारी पहाटे घडली घटना.

ठळक मुद्देमासे घेऊन जाणारा ट्रक महामार्गावर झाला होता पलटी. शनिवारी पहाटे घडली घटना.

शिरपूर : खोपोलीहून इंदूरकडे मासे घेऊन जाणारा ट्रक मुंबई आग्रा महामार्गावर पलटी झाला. या ट्रकमधील सर्व मासे रस्त्याच्या कडेला पडल्याने मासे घेण्यासाठी लहानमुलांसह आबालवृद्धांची मोठी गर्दी झाली.

शनिवारी पहाटे ५ वाजता मासे वाहतूक करणारा ट्रक मुंबई आग्रा महामार्गावरील चोपडा फाट्याजवळ असलेल्या उड्डाणपुलाजवळ पलटी झाला. या ट्रकमधील थर्माकॉलच्या खोक्यांमध्ये असलेले मासे रस्त्याच्या बाजूला असलेल्या कपाशीच्या शेतात पडले. या घटनेची माहिती शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर मासे पकडण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली. परिसरातील नागरिक तसेच महामार्गावर वाहतूक करणार्‍या वाहनचालकांनी मासे नेण्यासाठी एकच गर्दी केली. यावेळी घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिस स्थानकाचे पोलीस आणि महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परंतु मासे उचलून नेणारे नागरिक पोलिसांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मासे उचलण्यात व्यस्त होते.  

नागरिकांच्या हाती जेवढे मासे लागले. त्या व्यतिरिक्त उरलेल्या माशांना भरून ट्रक चालकाने ट्रक क्रेनद्वारे रस्त्यावर सरळ केली. चालकाने थोडेफार उरलेले मासे पुनः ट्रकमध्ये भरून तेथून निघणेच पसंत केले. या घटनेची पोलिसात तक्रार न करता ट्रक चालक  मासे घेऊन घटनास्थळावरून निघून गेला. विविध प्रकारचे खाण्यालायक असलेले सर्व मासे थर्माकॉलच्या खोक्यात बर्फात ठेवलेले होते. परंतु ट्रक पलटी झाल्याने सर्व खोकी रस्त्याच्या कडेला तर काही शेतात पडली.

मासे वाहतूक करणारी आयशर चोपडा फाट्यावर पलटी झाली. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. रस्त्यावर पडलेले मासे उचलण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु काही वेळानंतर पोलिसांच्या सहकार्याने ट्रक चालकाने आपले मासे पुन्हा खोक्यामध्ये भरले. पोलिसात तक्रार न देता उर्वरित मासे घेऊन चालक तिथून इंदूरकडे निघून गेला. सुरेश शिरसाठ, पोलीस निरिक्षक सांगवी पोलीस स्थानक

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रShirpurशिरपूरPoliceपोलिस