प्रथमच विधानसभा अध्यक्षपदाकरिता तीन उमेदवार
By Admin | Updated: November 12, 2014 02:13 IST2014-11-12T02:13:21+5:302014-11-12T02:13:21+5:30
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. मात्र या वेळी भाजपाच्या एकाही नेत्याने शिवसेना, काँग्रेस यांच्याशी चर्चा केली नाही.

प्रथमच विधानसभा अध्यक्षपदाकरिता तीन उमेदवार
मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. मात्र या वेळी भाजपाच्या एकाही नेत्याने शिवसेना, काँग्रेस यांच्याशी चर्चा केली नाही. त्यामुळे शिवसेनेतर्फे विजय औटी यांनी तर काँग्रेसच्यावतीने वर्षा गायकवाड यांनी अर्ज दाखल केले. यापूर्वी 1999 साली राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार सत्तेवरून गेले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आले तेव्हा आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार अरुण गुजराती विरुद्ध युतीचे गिरीश बापट यांची निवडणूक झाली होती.
अध्यक्षपदाच्या या निवडणुकीकरिता तिन्ही नावे असलेली मतपत्रिका सर्व आमदारांना दिली जाईल. त्यांनी त्यांच्या पसंतीच्या उमेदवारापुढे फुलीचे चिन्ह लिहायचे आहे. सुरुपसिंग नाईक यांनी सदस्यत्वाची शपथ मंगळवार्पयत न घेतल्याने त्यांना आणि गोविंद राठोड यांचे निधन झाले असल्याने ही दोन मते वगळता 286 आमदारांना मतदानाचा अधिकार आहे. वानगीदाखल असे गृहीत धरले की, बागडे यांना 138 मते मिळाली, औटी यांना 63 तर गायकवाड यांना 41 मते मिळाली तर औटी व गायकवाड यांना मिळालेल्या मतांची बेरीज 1क्4 होते. परंतु बागडे यांना मिळालेली मते ही या दोघांच्या मतांपेक्षा अधिक असल्याने बागडे हे विजयी घोषित होतात.
वानगीदाखल दुसरे उदाहरण असे गृहीत धरले की, बागडे यांना 11क् मते मिळाली, औटी यांना 8क् आणि गायकवाड यांना 4क् मते मिळाली तर औटी व गायकवाड यांच्या मतांची बेरीज 12क् होते. ही संख्या बागडे यांना मिळालेल्या मतांच्या संख्येपेक्षा अधिक असल्याने सर्वात कमी मते मिळवणा:या गायकवाड यांना बाद ठरवले जाते. त्यानंतर पुन्हा सर्व आमदारांना मतपत्रिका देऊन बागडे व औटी यांच्यात अध्यक्षपदाकरिता मतदान होईल व त्यामध्ये विजयी उमेदवारास अध्यक्षपद लाभेल. या शक्यतेतही बागडेंकडे जास्त मते असल्याने समजा भाजपाची मते घटली किंवा त्यांना अन्य पक्षांची साथ लाभली नाही तरीही भाजपाचा अध्यक्ष होतो. तिसरी शक्यता ही अशी की, समजा बागडे यांच्या विरोधातील शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला गेला. त्यामुळे बागडे विरुद्ध गायकवाड अशी लढत झाली. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची मते गायकवाड यांना पडली तरच बागडे सरळ लढतीत पराभूत होतात. मात्र काँग्रेस शिवसेनेच्या किंवा शिवसेना काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याची शक्यता कमी असल्याने ही शक्यता प्रत्यक्षात येणो अशक्य आहे. (विशेष प्रतिनिधी)
च्विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक टाळण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. मात्र तो अपयशी ठरला व तिन्ही उमेदवार रिंगणात राहिले तरीही भाजपाच्या बागडे यांचे पारडे जड आहे.
च्सुरुपसिंग नाईक यांनी सदस्यत्वाची शपथ मंगळवार्पयत न घेतल्याने त्यांना आणि गोविंद राठोड यांचे निधन झाले असल्याने ही दोन मते वगळता 286 आमदारांना मतदानाचा अधिकार आहे.