दिव्यांगांसाठी देशात पहिल्यांदाच विशेष प्रदर्शन
By Admin | Updated: September 20, 2016 03:05 IST2016-09-20T03:05:02+5:302016-09-20T03:05:02+5:30
अनेक समस्यांमधून दिव्यांगाना जावे लागते. पण शारीरिक कमतरतेचे दु:ख न बाळगता वेगवेगळ््या क्षेत्रात दिव्यांग पुढे आहेत.

दिव्यांगांसाठी देशात पहिल्यांदाच विशेष प्रदर्शन
मुंबई : अनेक समस्यांमधून दिव्यांगाना जावे लागते. पण शारीरिक कमतरतेचे दु:ख न बाळगता वेगवेगळ््या क्षेत्रात दिव्यांग पुढे आहेत. त्यांच्याकडून सगळ््यांनी प्रेरणा घ्यावी आणि मार्गक्रमण करावे, असे प्रतिपादन प्रभारी काऊंसिलेट जनरल मार्गरिटा बेरगफिल्ड मॅटिझ यांनी सोमवारी केले.
स्वीडन दूतावासाकडून देशातील दिव्यांगांच्या यशोगाथेला उजाळा देणाऱ्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये सोमवारी करण्यात आले होते. यावेळी दिव्यांगांविषयी मार्गरिटा बेरगफिल्ड बोलत होत्या.
त्या म्हणाल्या की, स्वीडनमध्ये अद्यापही अपंगांना समतेची लढाई जिंकता आलेली नाही. भारतात दिव्यांगांना विशेष आदर आहे. या माध्यमातून स्वीडनसोबत अन्य देशातीलही अपंगांना बळकटी मिळेल. या व्याख्यानासोबतच भारतीय आणि स्वीडन येथील दिव्यांगांच्या यशोगाथा ‘अॅक्सेसिबिलिटी’ या चित्रप्रदर्शनातून मांडण्यात आल्या आहेत.
यासोबतच दिव्यांगांसाठी विशेष साहित्याचे प्रदर्शनसुद्धा भरविण्यात आले आहे. यात अंधासाठी ब्रेल प्रिंटर, डोळ््याने कंट्रोल करु शकणारा कॉम्प्युटर अशी मॉडेल्स मांडण्यात आली आहेत. याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा याविषयीची माहिती यावेळी देण्यात आली. भारतात हे प्रदर्शन पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले असून यानंतर हे प्रदर्शन सिंगापूर, मॅसेडोनिया, बेलारुस, लाटव्हिया आणि ब्राझील येथे होणार आहे. (प्रतिनिधी)