पुण्यात यंदाच्या हंगामात मंगळवारी प्रथमच तापमान ४० पार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 08:37 PM2020-05-05T20:37:33+5:302020-05-05T20:58:09+5:30
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात वाढ
पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसगार्मुळे शहरात उन्हाळ्याची चर्चा जणू थांबली आहे. मंगळवारी शहरातील कमाल तापमानाने यंदाच्या हंगामात प्रथमच चाळीशी पार केली आहे. मंगळवारी शहरातील तापमान ४०.३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत २६ अंश सेल्सिअसने अधिक आहे. लोहगाव येथे ४१.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते सरासरीपेक्षा ३४ अंश सेल्सिअसने अधिक आहे.
लॉकडाऊनमुळे रस्त्यावरील गर्दी अजूनही तुरळक आहे. मे महिन्यात रस्तोरस्ती असलेली शीतपेयांची दुकाने, आईस्क्रिम पॉर्लर, रसवंतीगृहे सध्या बंद आहेत. त्यामुळे सूर्य आग ओकत असला तरी रस्त्यावर त्याचा दिसणारा प्रभाव लोकघरात असल्याने दिसून येत नाही. लोकही घरात असल्याने बाहेर सूर्याचा दाह किती प्रखर आहे, याची जाणीव होताना दिसत नाही. त्याचवेळी रात्रीचे तापमान हे राज्यात सर्वात कमी १९.५ अंश सेल्सिअस पुण्यात नोंदले गेले. त्यामुळे भर मे महिन्यात रात्र आल्हाददायक ठरत आहे.
मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात पुणे शहरातील कमाल तापमान प्रामुख्याने एक ते दोन दिवस ४० अंशाच्या पुढे जाते. काही वर्षी ते ४१अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.१० व ११ मे रोजी कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. त्याचवेळी दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील काही दिवस
किमान तापमानात वाढ होऊन ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
......................
* विदर्भात उष्णतेच्या लाटेची शक्यता..
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. पुढील दोन दिवसात कोकण, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४४.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे १९.५ अंश सेल्सिअस होते़ मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत वाढले आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी आज सरासरीच्या तुलनेत १ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली
आहे.
.......................................
*इशारा :
विदर्भात ६ मे रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.
७ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजेचा कडकडाटासह पावसाची शक्यता असून कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.८ मे रोजी विदर्भात वादळी वाºयासह पावसाची शक्यता असून मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.९ मे रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाºयासह गारपीट होण्याची शक्यताआहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यताआहे.
......
राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे ४०.३, लोहगाव ४१.४, जळगाव ४३.६, कोल्हापूर ३९.५, महाबळेश्वर ३४.१, मालेगाव ४२.२, नाशिक
३९.८, सोलापूर ४३.२, मुंबई ३४, सांताक्रुझ ३४.३, अलिबाग ३२.८, रत्नागिरी३४.५, पणजी ३४.८, डहाणु ३३.८, औरंगाबाद ४१.६, परभणी ४३.५, नांदेड ४३,अकोला ४४.९, अमरावती ४३.४, बुलढाणा ४०.८, ब्रम्हपूरी ४४, चंद्रपूर ४४,
गोेंदिया ४०.२, नागपूर ४२.४, वाशिम ४३
.....
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात ८ व ९ मे रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोलापूरला ९ मे रोजी पावसाची शक्यता आहे. विदर्भात जवळपास सर्व जिल्ह्यात ७ ते ९ मे दरम्यान हलक्या पावसाची शक्यता आहे.