शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत समारंभादिनी शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:40 PM2021-04-06T16:40:39+5:302021-04-06T16:59:48+5:30

दरवर्षी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती अशा उत्साही, आनंदी वातावरणामध्ये दीक्षांत समारंभ होतो. विद्यापीठ कॅम्पस गर्दीने फुललेला असतो. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिवाजी विद्यापीठाने पारंपारिक पध्दतीला छेद दिला. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच ५७ वा दीक्षांत समारंभ मंगळवारी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला. त्यामुळे दीक्षांत समारंभ असूनही मुख्य इमारत वगळता अन्य परिसरात शुकशुकाट पसरला होता. दीक्षांत विभागाकडून सर्व ७७,५४२ स्नातकांना पोस्टाव्दारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहेत.

For the first time in the history of Shivaji University, the inauguration ceremony was a success | शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत समारंभादिनी शुकशुकाट

दरवर्षी दीक्षांत समारंभादिनी शिवाजी विद्यापीठाचा कॅम्पस गर्दीने फुलून जातो. यावर्षी मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ ऑनलाईन पध्दतीने झाला. त्यामुळे विद्यापीठ परिसरात शुकशुकाट दिसून आला. (छाया : नसीर अत्तार)

googlenewsNext
ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच दीक्षांत समारंभादिनी शुकशुकाट ऑनलाईन कार्यक्रम : ७७,५४२ स्नातकांना पोस्टाव्दारे पदवी प्रमाणपत्र

 कोल्हापूर : दरवर्षी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थिती अशा उत्साही, आनंदी वातावरणामध्ये दीक्षांत समारंभ होतो. विद्यापीठ कॅम्पस गर्दीने फुललेला असतो. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिवाजी विद्यापीठाने पारंपारिक पध्दतीला छेद दिला. विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच ५७ वा दीक्षांत समारंभ मंगळवारी ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला. त्यामुळे दीक्षांत समारंभ असूनही मुख्य इमारत वगळता अन्य परिसरात शुकशुकाट पसरला होता. दीक्षांत विभागाकडून सर्व ७७,५४२ स्नातकांना पोस्टाव्दारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहेत.

विद्यापीठात मंगळवारी सकाळी पावणे अकरा वाजता दीक्षांत मिरवणूक सुरू झाली. कुलगुरू कार्यालयापासून राजर्षी शाहू सभागृहामध्ये ती मिरवणूक आली. त्यामध्ये ह्यज्ञानदंडह्ण घेवून परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे होते. त्यासह कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के आणि अन्य अधिकारी, अधिष्ठाता होते.

कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून समारंभ पार पडला. त्याचे शिववार्ता युट्युब वाहिनीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. हा कार्यक्रम ६९०६ जणांनी पाहिला. दरम्यान, दरवर्षी विद्यापीठातील शिवपुतळा परिसर, दीक्षांत समारंभ सभागृह, परीक्षा भवन, ग्रंथालय परिसर, आदी ठिकाणे विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून जातात. कोरोनाची धास्ती आणि ऑनलाईन समारंभामुळे मंगळवारी या परिसरात शुकशुकाट पसरला होता.

 

Web Title: For the first time in the history of Shivaji University, the inauguration ceremony was a success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.