शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली एसटी

By admin | Updated: August 9, 2016 22:18 IST

देशाला स्वातंत्र्य मिळालं, गावागावात रस्ते आले आणि वीजही.

ऑनलाइन लोकमत

दावडी, दि.09 -  देशाला स्वातंत्र्य मिळालं, गावागावात रस्ते आले आणि वीजही. परंतु पुण्यात आजही असे एक गाव आहे जिथे स्वातंत्र्यानंतरही कधी एसटीच पोहोचली नव्हती. मात्र आज इतक्या वर्षानंतर गावात एसटी आली आणि साऱ्या गावाने एसटीचे मनापासून उत्साहात स्वागत केले आणि आनंदोत्सव केला. आज सकाळी अकरा वाजता पहिल्यांदा गावात एसटी आली. ग्रामस्थ व विदयार्थ्यांनी जल्लोष करुन टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. चालक व वाहक यांना महिलांनी औक्षण केले. एसटी बससमोर ग्रामस्थांनी खंडोबा देवाची तळी भरुन या एसटी बसची पुजा केली. आता दिवसभरात खेड ते खरपुडी सकाळ व संध्याकाळ एसटीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द नावाचं हे गाव. खेड सारख्या प्रगतीशील तालुक्यापासून अवघ्या १२ किमी अंतरावरचं. गावाची लोकसंख्याही बाराशेच्या आसपास. गावात प्रती जेजुरी म्हणून ओळखलं जाणारं एक खंडोबाचं मंदिरही. खंडोबाच्या दर्शनासाठी राज्यभरातून दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने येतात. परंतु आजतागायत गावातल्या कुणालाही एसटीची सुविधा नव्हती. खरपुडी खुर्द (ता. खेड) येथे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात एसटी बस आली. गावात एसटी आल्यामुळे ग्रामस्थांनी मोठया उत्साहात एसटीचे स्वागत करून आनंद व्यक्त केला.ग्रामस्थ, महिला, जेष्ठ नागरिक, वृध्द व विद्यार्थी अशा साऱ्यांनाच जवळच्या शिरोली फाटा किंवा नदीपालिकडील खरपुडी बुद्रुक येथे जायचे असेल तर चार ते पाच किलोमीटर अंतराची पायपीट ठरलेली. ती अंगवळणीही पडलेली. खंडोबा देवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एसटी बस व इतर वाहनांची सोय नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत राहायची. गावाला एसटी बस सुरू व्हावी यासाठी ग्रामस्थांनी गेले कित्येक वर्षांपासून मागणी होती. खंडोबा देवस्थान ट्रस्टीचे माजी अध्यक्ष संदिप गाडे, मल्हारी काळे व ग्रामस्थांनी राजगुरुनगर बसस्थानक प्रमूखाकडे याबाबत पाठपुरावाही केला होता. खरपुडी, ठाकरवस्ती, काळेवस्ती, मलघेवस्ती, शिरोली फाटा येथील विद्यार्थी व ग्रामस्थांना या एसटी बसमुळे प्रवास सुलभ होणार आहे. यावेळी सरपंच अनिता गाडे, उपसरपंच बंडोपंत गाडे, संदिप गाडे, खंडोबा देवस्थान ट्रस्टी अध्यक्ष सोपान गाडे, माणिकशेठ गाडे, हिराबाई काळे, गणेश गाडे, सुप्रिया गाडे, मिनाक्षी खंडागळे, सुदाम गाडे, धोडिभाऊ गाडे, कांताराम शिंदे, हिरामण मलघे, बाळासाहेब माकर, संभाजी गाडे, मुरलीधर गाडे आदी उपस्थित होते.