सोमेश्वरनगरला रंगले पहिले अश्वरिंगण

By admin | Published: June 28, 2014 10:44 PM2014-06-28T22:44:58+5:302014-06-28T22:44:58+5:30

हजारो वारक:यांच्या उपस्थितीत विठुनामाचा गजर करीत सोपानकाका पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण पार पडले.

First Searcher | सोमेश्वरनगरला रंगले पहिले अश्वरिंगण

सोमेश्वरनगरला रंगले पहिले अश्वरिंगण

Next
>सोमेश्वरनगर  :  सोमेश्वरनगर (ता. बारामती) येथे आज हजारो वारक:यांच्या उपस्थितीत विठुनामाचा गजर करीत सोपानकाका पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण पार पडले. ‘सोपानकाका चरणी, अश्व धावताच रिंगणी’ हजारो भाविकांच्या उपस्थितीत अश्व रिंगणाने डोळ्यांचे पारणो फेडले.
काल बारामती तालुक्यात सोपानकाका पालखी सोहळ्याने प्रवेश केला. काल रात्रीचा निंबूतचा मुक्काम उरकून हा सोहळा सोमेश्वरनगरच्या दिशेने रात्रीच्या मुक्कामासाठी ङोपावला. सकाळी आठ वाजता निंबूत छप्री येथे हा सोहळा सकाळच्या चहापानसाठी विसावला.
या ठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, निंबूतचे उपसरपंच अमर काकडे, बारामती पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण गोफणो, कृषी औद्योगिक संघाचे उपाध्यक्ष गौतम काकडे व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. 
दीड तासाच्या विसाव्यानंतर हा सोहळा सकाळी 11 वाजता दुपारच्या न्याहारीसाठी वाघळवाडी येथे विसावला. 
या ठिकाणी सरपंच प्रतिभा नेवशे, उपसरपंच गणोश जाधव, समर्थ ज्ञानपीठचे अध्यक्ष दत्ता सावंत, माजी सरपंच सतीश सकुंडे, संजय घाडगे सदस्य विजय गायकवाड व ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळ्याला ग्रामस्थांच्या वतीने ‘पिठलं-भाकरी’चे दुपारचे जेवण देण्यात आले. दुपारच्या विसाव्यानंतर पालखी दुपारी 3 वाजता अश्वरिंगणासाठी मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या मैदानावर आला.
 या ठिकाणी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते रथांच्या बैलांचे व अश्वाचे पूजन करण्यात आले.
या वेळी सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, उपाध्यक्ष सुनील भगत, मु. सा. काकडे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, सोमेश्वरचे प्र. कार्यकारी संचालक सुभाष धुमाळ, संचालक रघुनाथ भोसले, रूपचंद शेंडकर, सोमेश्वर विद्यालयाचे प्राचार्य सी. एल. जगताप, डॉ. मनोज खोमणो, शेतकी अधिकारी सोमनाथ बेलपत्रे आदींबरोबर विद्यालयातील शेकडो मुलांनी झांजपथक वाजवून पालखीचे स्वागत केले. (वार्ताहर)
 
4 सोपानकाका पालखीचे पहिलेच रिंगण असल्याने हे रिंगण पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. सुरुवातीला काकांच्या पादुकांच्या पालखीने पूर्ण मैदानाला रिंगण मारले. त्यानंतर अश्वाने संपूर्ण मैदानाला तीन वेळा गोल रिंगण घालते. हे पाहणा:यांच्या डोळ्यांचे पारणो फिटले. या वेळी संपूर्ण मैदान विठुनामाच्या गजराने दणाणून गेले. त्यांनतर सायंकाळी 6 वाजता पालखी मुक्कामासाठी कारखान्याच्या छत्रपती 
मैदानावर विसावली.

Web Title: First Searcher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.