नाट्यगृहाच्या भूमिपूजनाचा पहिला अंक आठवडाभरात
By Admin | Updated: May 30, 2014 09:06 IST2014-05-30T01:13:17+5:302014-05-30T09:06:57+5:30
अहमदनगर : नाट्यगृह उभारणीची नाट्यप्रेमींची प्रतीक्षा आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. येत्या आठवडाभरात सावेडीत नाट्यगृह बांधकामाला प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे.

नाट्यगृहाच्या भूमिपूजनाचा पहिला अंक आठवडाभरात
अहमदनगर : नाट्यगृह उभारणीची नाट्यप्रेमींची प्रतीक्षा आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. येत्या आठवडाभरात सावेडीत नाट्यगृह बांधकामाला प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. महापौर संग्राम जगताप यांनी नियोजीत जागेची पाहणी केल्यानंतर ही माहिती दिली. नाट्यगृह उभारणीसाठी शासनाकडून ६० लाख रुपयांचा निधी महापालिकेस प्राप्त झाला आहे. ५०० आसन क्षमतेचे बंदिस्त नाट्यगृह बांधण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. सावेडीतील क्रिडा संकुल येथे हे नाट्यगृह उभारले जाणार आहे. तेथील जुन्या क्रिडा संकुलाची इमारत त्यासाठी पाडली जात आहे. महापौर संग्राम जगताप यांनी गुरूवारी नियोजीत जागेस भेट देऊन पाहणी केली. शहरात चांगले नाट्यगृह असावे अशी अनेक वर्षापासून नाट्यप्रेमींची मागणी आहे. परंतु नाट्यगृहाचे बांधकाम सुरू होण्यास अनंत अडचणी आल्या. जगताप यांनी या अडचणींवर मात करत प्रत्यक्षात काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. ए.सी.कोठारी यांना नाट्यगृह बांधणीचे काम देण्यात आले आहे. शहर अभियंता नंदकुमार मगर यांनी नाट्यगृह कसे असेल याची माहिती दिली. कालबध्द नियोजन करून हे नाट्यगृह लवकरच नाट्यप्रेमींना खुले होणार असल्याचे जगताप यांनी यावेळी सांगितले. नगरसेवक कैलास गिरवले, गणेश भोसले, निखील वारे, अरीफ शेख, श्रीनिवास बोज्जा, राजेंद्र देवळालीकर आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)