शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आधी फाशी, मग चौकशी कशी?, वनमंत्री राठोड यांचा सेनेकडून बचाव; विरोधकांना संयमाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 05:33 IST

sanjay rathod : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे.

मुंबई : ‘आधी फाशी, मग चौकशी’ हा उफराटा न्याय योग्य नाही. वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत पोलीस चौकशीत काय ते सत्य बाहेर आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील’ अशी भूमिका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी मांडली. त्यामुळे पक्षाने राठोड यांना अभय दिले असल्याचे सध्याचे चित्र आहे.टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली आहे. राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा मंगळवारी सकाळपासून सुरू होती. मात्र, त्यांनी राजीनामा दिलेला नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, की विरोधी पक्ष हे राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करीत आहेत, ती योग्य नाही. विरोधकांनी संयमाने घेण्याची गरज आहे. चौकशी न करताच एखाद्याला फाशी देणे योग्य नाही. महाराष्ट्राच्या मातीत सत्य आणि न्याय आहे, पोलीस चौकशीत तथ्य समोर येईलच. मीडिया ट्रायलदेखील योग्य नाही. चौकशीपूर्वीच निष्कर्ष काढून शिक्षा देऊन मोकळे होणे हे चुकीचे आहे. केवळ संजय राठोड म्हणून नव्हे, तर पूजा चव्हाणलाही न्याय मिळावा यासाठी चौकशी आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या बैठकीत चर्चाविधिमंडळाचे आगामी अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांची निवड या संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदारांची बैठक घेतली. वनमंत्री संजय राठोड यांच्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.राठोड मात्र या बैठकीला हजर नव्हते. पूजा चव्हाण आत्महत्येनंतर ते जनतेसमोर कुठेही आलेले नाहीत. बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे गुरुवारी संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात राठोड त्यांचे मौन तोडतील असे म्हटले जाते.

राजीनामा ही अफवामाझ्याबाबत आपण घ्याल तो निर्णय मला मान्य असेल, असे राठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केल्याचे वृत्त काही वृत्त वाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले होते. तथापि, त्यांनी राजीनामा दिलेला नाही, असे यवतमाळचे शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोडPooja Chavanपूजा चव्हाण