शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आधी ग्रामपंचायतीची निवडणूक, नंतर सरपंचपदासाठी सोडत, राज्य सरकारचा मोठा निर्णय

By बाळकृष्ण परब | Updated: December 15, 2020 10:53 IST

Maharashtra Gram Panchayat election : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, या ग्रामपंचातयींच्या सरपंचपदासाठी आधी जाहीर केलेली आरक्षणाची सोडत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

ठळक मुद्देराज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी होणार मतदान या ग्रामपंचातयींच्या सरपंचपदासाठी आधी जाहीर केलेली आरक्षणाची सोडत रद्द करण्याचा राज्य सरकारने घेतला निर्णय सरपंचपदासाठी होणार घोडेबाजार थांबावा, तसेच खोटी जात प्रमाणपत्रे दाखवून निवडणुका लढवण्याचे प्रकार वाढत असल्याने घेण्यात आला हा निर्णय

मुंबई - कोरोनामुळे  लांबणीवर पडलेल्या आणि मुदत संपलेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र या ग्रामपंचातयींच्या सरपंचपदासाठी आधी जाहीर केलेली आरक्षणाची सोडत रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, आता या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी जानेवारीमध्ये आरक्षण सोडत होणार आहे.राज्याच्या ग्रामविकास खात्याने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. सरपंचपदासाठी होणार घोडेबाजार थांबावा, तसेच खोटी जात प्रमाणपत्रे दाखवून निवडणुका लढवण्याचे प्रकार वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले होते. ते आरक्षणही या नव्या आदेशानंतर रद्द करण्यात आले आहे.राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान; तर १८ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी शुक्रवारी येथे केली. यानिमित्ताने ग्रामीण महाराष्ट्राचे राजकारण रंगणार आहे. एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च रोजी मतदान होणार होते; परंतु कोरोनाची परिस्थिती उद्‌भवल्याने १७ मार्च रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.उमेदवारी अर्ज ३० डिसेंबरपर्यंतया निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत स्वीकारले जातील. शासकीय सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल. उमेदवारी अर्ज ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १८ जानेवारी रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ पर्यंत असेल. २५ सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.निवडणूक होणाऱ्या ग्रा.पं.ची जिल्हानिहाय संख्याठाणे- १५८, पालघर- ३, रायगड- ८८, रत्नागिरी- ४७९, सिंधुदुर्ग- ७०, नाशिक- ६२१, धुळे- २१८, जळगाव- ७८३, अहमदनगर- ७६७, नंदुरबार- ८७, पुणे- ७४८, सोलापूर- ६५८, सातारा- ८७९, सांगली- १५२, कोल्हापूर- ४३३, औरंगाबाद- ६१८,  बीड- १२९,  नांदेड- १०१५, उस्मानाबाद- ४२८, परभणी- ५६६, जालना- ४७५,  लातूर- ४०८, हिंगोली- ४९५, अमरावती- ५५३,  अकोला- २२५, यवतमाळ- ९८०,  वाशीम- १६३, बुलडाणा- ५२७, नागपूर- १३०, वर्धा- ५०,  चंद्रपूर- ६२९, भंडारा- १४८, गोंदिया- १८९ आणि गडचिरोली- ३६२. एकूण- १४२३४. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचElectionनिवडणूकreservationआरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार