शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आधी स्थगिती, आता शिंदे सरकारने पुन्हा केलं औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतर, केला एक बदल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 12:46 IST

Maharashtra Government News: शिंदे सरकारकडून औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्यात आलं आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाचं नामकरण दि. बा. पाटील विमानतळ असं करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने केली आहे.

मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती दिल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. मात्र आज शिंदे सरकारने औरंगाबाद आणि संभाजीनगरच्या नामांतराचा निर्णय पुन्हा एकदा घेतला आहे. तसेच औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्यात आलं आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाचं नामकरण लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असं करण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने केली आहे.

राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय कायदेशीर अडचणीत अडकू नये म्हणून एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने काल ह्या निर्णयाला स्थगिती दिली होती. दरम्यान, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारने पुन्हा एकदा औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नामांतर करण्यात आलं आहे. त्यानुसार औरंगाबादचं नामांतर हे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशीव असं करण्यात आलं आहे.

आज मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये अल्पमतात असलेल्या ठाकरे सरकारने घाईगडबडीत घेतलेले काही निर्णय काही कायदेशीर अ़डचणी निर्माण होऊ नयेत म्हणून पुन्हा घेण्यात आले आहेत. त्यामध्ये औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं करण्याचा निर्णय झाला आहे. त्याबरोबरच नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

तसेच नामांतराबाबत ठराव करावा लागतो. हा ठराव विधानमंडळ मंजूर करेल. त्यानंतर तो मान्यतेसाठी केंद्र सरकारकडे पाठवावा लागतो. तो आम्ही पाठवून लवकरात लवकर मंजूर करून आणू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे - औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय - उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याचा निर्णय - नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे नामकरण करण्याचा निर्णय -  एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज उभारण्यास तत्वतः मान्यता. तसेच पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींच्या रकमेस शासन हमी देणार.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादOsmanabadउस्मानाबाद