नागपुरात एकतर्फी प्रेमातून मुलीच्या आईवर गोळीबार
By Admin | Updated: October 19, 2014 02:22 IST2014-10-19T02:22:48+5:302014-10-19T02:22:48+5:30
भाकर पंडित (28) असे गोळीबार करणा:या तरुणाचे नाव असून, गीता सुखदेवराव डोंगरे (45) ही महिला गंभीर जखमी झाली आह़े

नागपुरात एकतर्फी प्रेमातून मुलीच्या आईवर गोळीबार
नागपूर : मुलगी देण्यास नकार देऊन मुलीला मागणी घालणा:याचा चारचौघात पाणउतारा केल्याच्या रागातून तरुणाने मुलीच्या आईवर गोळीबार केल्याची थरारक घटना शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास सिरसपेठ (इमामवाडा) परिसरात घडली. प्रभाकर पंडित (28) असे गोळीबार करणा:या तरुणाचे नाव असून, गीता सुखदेवराव डोंगरे (45) ही महिला गंभीर जखमी झाली आह़े
प्रभाकर पंडित टाइल्स फिटिंगचे काम करतो. गीता डोंगरे यांचा पुतण्या नरेंद्र पाटील हा प्रभाकरसोबत काम करतो. सहा महिन्यांपूर्वी नरेंद्रच्या ओळखीतून गीता यांनी घरात टाईल्स फिटिंगचे काम प्रभाकरला दिले होते. तेव्हापासून तो अधूनमधून गीता यांच्या घरी यायचा.
गीता यांच्या मुलीशी त्याची मैत्री झाली. तो तिच्या प्रेमात पडला. तिच्याशी लग्न करण्यासाठी तो प्रयत्नरत होता. गीता यांनी त्याची प्रेमाने समजूत काढून त्याला नकार दिला होता.
शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास प्रभाकर गीता यांच्या घरी पोहोचला. त्याने पुन्हा लग्नाची गोष्ट काढून मुलीची मागणी घातली. गीता यांनी ती धुडकावून लावतानाच प्रभाकरची खरडपट्टीही काढली. या रागातून प्रभाकरने जवळ लपवून ठेवलेला देशीकट्टा काढला आणि गीता यांच्यावर गोळी झाडली.