अंधेरीत गोळीबार

By Admin | Updated: May 21, 2016 02:20 IST2016-05-21T02:20:05+5:302016-05-21T02:20:05+5:30

अंधेरी येथील गुंदवली परिसरात रात्री ९.३०च्या सुमारास अमजद इस्माईल मुजावर नावाच्या गुंडाने गोळीबार केला.

Firing in the dark | अंधेरीत गोळीबार

अंधेरीत गोळीबार


मुंबई : अंधेरी येथील गुंदवली परिसरात रात्री ९.३०च्या सुमारास अमजद इस्माईल मुजावर नावाच्या गुंडाने गोळीबार केला. यात विठोबा झेंडे नावाची व्यक्ती जखमी झाली. विठोबाला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल केले आहे.
गोळीबाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पूर्ववैमनस्यातून हे प्रकरण घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अमजदविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तडीपार असूनही अमजदचा परिसरामध्ये शस्त्रांसह वावर असायचा. विठोबा झेंडे यांनी एक वर्षांपूर्वी आरोपीची पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर आरोपीला तडीपार केले होते. आरोपीचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Firing in the dark