दारूसाठी पैसे न दिल्याने घराला आग !

By Admin | Updated: July 12, 2015 02:38 IST2015-07-12T02:38:44+5:302015-07-12T02:38:44+5:30

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाने पत्नीसह पाच मुलींना घरात कोंडून घराला आग लावल्याची घटना तालुक्यातील बोरगडी (जुने) येथे घडली.

Fire without giving money for the house! | दारूसाठी पैसे न दिल्याने घराला आग !

दारूसाठी पैसे न दिल्याने घराला आग !

पुसद (यवतमाळ) : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकाने पत्नीसह पाच मुलींना घरात कोंडून घराला आग लावल्याची घटना तालुक्यातील बोरगडी (जुने) येथे घडली. सुदैवाने यात या दारुड्याचे कुटुंब वाचले.
बोरगडी येथील राजेश लक्ष्मण मुळे (४०) याला दारूचे व्यसन आहे. शुक्रवारी रात्री त्याने पत्नीकडे दारूसाठी पैसे मागितले. तिने
नकार देताच रागाच्या भरात त्याने त्याची पत्नी लताबाई यांना मारहाण केली.
एवढ्यावरच न थांबता त्याने लताबाई व पाच मुलींना घरात कोंडून दरवाजाला कडी लावली आणि घराला आग लावून दिली. लताबाई व पाच मुलींनी जीवाच्या आकांताने दरवाजा तोडून घराबाहेर पळ काढल्याने सुदैवाने त्या वाचल्या.
गावातच त्या लपून बसल्या. त्यानंतरही राजेश त्यांना मारण्याच्या उद्देशाने रात्रभर त्यांचा शोध घेत होता. नेहमीचेच भांडण म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते. शनिवारी लताबाईंनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी राजेशला अटक केली. (प्रतिनिधी)

Web Title: Fire without giving money for the house!