पंढरपूरात ट्रान्सपोर्ट कार्यालयाला आग; लाखो रुपयांचे नुकसान
By Admin | Updated: August 1, 2016 22:08 IST2016-08-01T20:43:37+5:302016-08-01T22:08:28+5:30
येथील एका ट्रान्सपोर्टच्या कार्यालयाला अज्ञात कारणाने आग लागली असून यामूळे शहरातील अनेक व्यापा-यांचा विविध पध्दतीचा माल जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पंढरपूरात ट्रान्सपोर्ट कार्यालयाला आग; लाखो रुपयांचे नुकसान
>ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. १ - येथील एका ट्रान्सपोर्टच्या कार्यालयाला अज्ञात कारणाने आग लागली असून यामूळे शहरातील अनेक व्यापा-यांचा विविध पध्दतीचा माल जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना सेंन्ट्रल नाका, येथे सोमवारी पहाटे सोडेतीनच्या सुमारास घडली आहे.
नितीन नंदकुमार कदम (वय २४, धंदा ट्रान्सपोर्ट, रा. कडबे गल्ली, पंढरपूर) यांच्या सेंन्ट्रल नाका येथील ट्रान्सपोर्टच्या कार्यालयाला अज्ञात कारणाने आग सोमवारी आग लागली. या कार्यालयामधील बांगडी डाग, अॅटोमोबाईल डाग, केबल बंडल, वह्या पुस्तके बंडल, कापडी गाठी, मेडीकल डाग व अनेक व्यापाºयांचा माल जळाला आहे. याबाबत नितीन कदम यांनी ५ लाखाचे नुकसान झाली असल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
मात्र शहरातील अनेक व्यापा-यांचा माल या ट्रान्सपोर्टने पंढरपूर मध्ये येतो. यामुळे आगीत माल जळून नुकसान झालेल्या व्यापा-यांमधून चिंता व्यक्त होत आहे. याबाबत पुढील तपास पो.हे.कॉ. ननवरे करित आहेत.