गोवंडी भीमवाडी झोपडपट्टी परिसरात आग

By Admin | Updated: May 6, 2016 08:24 IST2016-05-06T06:15:48+5:302016-05-06T08:24:54+5:30

मुंबईतील गोवंडी भीमवाडी झोपडपट्टी परिसरात आग लागली असून आग विझविण्यासाठी अग्नीशमन दलाच्या १४ गाड्या आणि आठ वॉटर टॅंकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Fire in Govandi Bhimwadi slum area | गोवंडी भीमवाडी झोपडपट्टी परिसरात आग

गोवंडी भीमवाडी झोपडपट्टी परिसरात आग

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.६ - मुंबईतील गोवंडी भीमवाडी झोपडपट्टी परिसरात आग लागली असून आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या आणि आठ वॉटर टॅंकर घटनास्थळी दाखल झाले आहेत.
गोवंडी भीमवाडी परिसरात अनेक झोपड्या असून याठिकाणी आज सकाळी चार वाजताच्या सुमारास आग लागल्याचे समजते. तर, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या आणि आठ वॉटर टॅंकर्स घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिऴविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, ही आग सिलिंडरच्या स्फोटामुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, या आगीत अद्याप कोणतीही जीवितहाणी झाली नसल्याचे समजते. 

 

Web Title: Fire in Govandi Bhimwadi slum area