अंधेरीतील इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू
By Admin | Updated: July 18, 2014 16:01 IST2014-07-18T14:33:33+5:302014-07-18T16:01:00+5:30
अंधेरीतील लिंक रोडवरील लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे.

अंधेरीतील इमारतीला आग, अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू
>
ऑनलाइन टीम
मुंबी, दि. १८ - अंधेरीतील लिंक रोडवरील लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. बोरीवली फायर स्टेशनमधील नितीन येवलेकर यांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याचे समजते. तर ६ जण जखमी झाले आहेत. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
शुक्रवारी सकाळी लोटस बिझनेस पार्कच्या २१ व २२ या शेवटच्या दोन मजल्यांना आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र आग आणखीनच भडकत गेली. आग विझवण्याचा प्रयत्न करणारे जवान या इमारतीत अडकले. त्यांच्या सुटकेसाठी नौदलाच्या हेलीकॉप्टर्सची मदत घेण्यात आली.
लोटस पार्कमध्ये अभिनेता हृतिक रोशनची एकूण पाच मजल्यांवर कार्यालये आहेत. तसेच अनेक बड्या उद्योजकांची इथे कार्यालये असून बघ्यांच्या झालेल्या प्रचंड गर्दीमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना काम करण्यात अडथळे येत होते.
आगीमुळे इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून २१ व २२ वा मजला जळून खाक झाले आहेत.