धुळे मनपाची अग्निशमन गाडी उलटली, 2 कर्मचारी जखमी
By Admin | Updated: April 18, 2017 18:44 IST2017-04-18T18:44:03+5:302017-04-18T18:44:03+5:30
धुळे महानगरपालिकेची अग्निशमन वाहन गाडी गरताडबारी घाटात महामार्गावर उलटल्याने २ कर्मचारी जखमी झाले

धुळे मनपाची अग्निशमन गाडी उलटली, 2 कर्मचारी जखमी
>ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 18 - धुळे महानगरपालिकेची अग्निशमन वाहन गाडी गरताडबारी घाटात महामार्गावर उलटल्याने २ कर्मचारी जखमी झाले आहेत. धुळे तालुक्यातील रतनपूरा येथे नदीकिनारी लागलेल्या काटेरी झुडपांना लागलेली आग विझवण्यासाठी धुळे मनपाचे अग्निशमन वाहन जात असताना धुळे-सोलापूर मार्गावरील गरताडबारी घाटात विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन बंबाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन उलटले.
जखमी झालेल्यांमध्ये अग्निशमन बंबचा चालक दगडू पुंडलिक मोरे, फायरमन अतुल गुलाबसिंग पाटील यांचा समावेश आहे.या दोघांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ज्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला तो कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.