चंद्रपुरात समाधान पूर्ती सुपर मार्केटमध्ये आग, कोट्यवधींचे नुकसान

By Admin | Updated: October 31, 2016 13:24 IST2016-10-31T13:15:46+5:302016-10-31T13:24:43+5:30

समाधान पूर्ती सुपर मार्केटमध्ये रविवारी रात्री उशीरा लागलेली भीषण आग आज सकाळी 11.30 वाजता आटोक्यात आली आहे.

Fire, billions of losses in Chandrapur Solutions Furnishi Super Market | चंद्रपुरात समाधान पूर्ती सुपर मार्केटमध्ये आग, कोट्यवधींचे नुकसान

चंद्रपुरात समाधान पूर्ती सुपर मार्केटमध्ये आग, कोट्यवधींचे नुकसान

ऑनलाइन लोकमत

चंद्रपूर, दि. 31 -  समाधान पूर्ती सुपर मार्केटमध्ये रविवारी रात्री उशीरा लागलेली भीषण आग आज सकाळी 11.30 वाजता आटोक्यात आली आहे. या आगीमध्ये सुमारे तीन ते चार कोटी रुपयांच्या सामानाचे नुकसान झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. मार्केटशेजारी असणा-या पोपट इमारतीसह अन्य इमारतींमध्येदेखील ही आग पसरल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. 
 
फायर ब्रिगेडच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अखेर आज सकाळी ही आटोक्यात आणली आहे. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ही आग इतकी भीषण होती की, आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या 50 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. 
 
ज्यावेळी ही लाग लागली त्यावेळी घटनास्थळी कुणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमध्ये बाजारातील कोट्यवधी रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे. मात्र आग कोणत्या कारणामुळे लागली हे अजूनही अस्पष्ट आहे. 
 
 
 
 
 
 

Web Title: Fire, billions of losses in Chandrapur Solutions Furnishi Super Market