शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ शोधा : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 18:51 IST

शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांच्या बरोबर फळे आणि फुलांच्या शेतीकडे वळावे...

ठळक मुद्देपारंपारिक पिकांबरोबर फळे-फुलांची शेती करण्याचा सल्ला

पुणे : ‘‘नवीन तंत्रज्ञान, पिकांच्या नव्या जातींमुळे उत्पादन दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या उत्पादनाला देशी बाजारपेठ पुरी पडणार नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कशी मिळेल याचा विचार केला पाहीजे. उत्पन्न वाढवायचे असेल तर शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांच्या बरोबर फळे आणि फुलांच्या शेतीकडे वळावे,’’ असा सल्ला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शनिवारी येथे दिला. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक ए. के. सिंग, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु के. पी. विश्वनाथा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु एस. डी. सावंत, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, उपाध्यक्ष शिवाजी पवार, कैलास भोसले, अरविंद कांचन आदी या वेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, नवीन तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होताना दिसते. मात्र, बाजारपेठेअभावी भाव मिळत नसल्याने निराशा येते. युरोपात निर्यात होणाऱ्या एकूण द्राक्षापैकी ९८ टक्के द्राक्ष महाराष्ट्रातून जातात. चीन आणि दक्षिण आशियाई देशांची बाजारपेठ देखील निर्माण केली पाहीजे. द्राक्ष संघाने हंगामाच्या सुरुवातीला निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय मेळावा घेतला पाहीजे. निर्यातीसाठी केंद्रीय स्तरावर काही अडचण असल्यास त्यासाठी मी स्वत: पुढाकार घेईन.

‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सध्या प्रयत्न सुरु असून प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावे त्यासाठी निवडण्यात आली आहेत. या पुढे एकात्मिक कृषी आराखडा आखावा लागेल. आंतरपीक अथवा मत्स्य शेतीसारखे प्रयोग करावे लागतील. तरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते,’’ असे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक मोहपात्रा म्हणाले. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु सावंत म्हणाले, की केवळ एकच पीक घेऊन चालणार नाही. द्राक्ष बागेसाठी तयार करण्यात येणाऱ्या शेततळ्यात मत्स्य उत्पादन घेते पाहीजे. एका वर्षांत शेततळ्याचा खर्च वसूल होईल. तसेच, तळ्यातील पाणी सिंचनासाठी वापरल्यास रोपांची रोगप्रतिकारक क्षमता वाढत असल्याचे प्राथमिक प्रयोगातून समोर आले आहे.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारagricultureशेतीFarmerशेतकरी