बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे  आर्थिक व्यवहारांना फटका, राज्यातील ५० हजार बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 07:52 AM2021-03-16T07:52:10+5:302021-03-16T07:53:05+5:30

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर म्हणाले, देशभरातील एक लाखापेक्षा जास्त बँक शाखांमध्ये काम करणारे १० लाख बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाची सुरुवात केली.

Financial transactions hit due to strike of bank employees, participation of 50,000 bank officers and employees in the state | बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे  आर्थिक व्यवहारांना फटका, राज्यातील ५० हजार बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे  आर्थिक व्यवहारांना फटका, राज्यातील ५० हजार बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभाग

Next

 

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांनी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. सोमवारी  या संपात राज्यातील ५० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. संपामुळे शहरी, ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांना फटका बसला.  (Financial transactions hit due to strike of bank employees, participation of 50,000 bank officers and employees in the state)

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे निमंत्रक देवीदास तुळजापूरकर म्हणाले, देशभरातील एक लाखापेक्षा जास्त बँक शाखांमध्ये काम करणारे १० लाख बँक कर्मचारी, अधिकाऱ्यांनी दोन दिवसांच्या संपाची सुरुवात केली. १० हजारांहून जास्त शाखांतून काम करणारे ५० हजारांहून अधिक बँक कर्मचारी आणि अधिकारी या संपात सहभागी झाले होते. यात सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकातील सफाई कर्मचारी सहभागी झाल्यामुळे बँकांचे   दरवाजे उघडले गेले नाहीत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनची एक बैठक या आठवड्यात अपेक्षित आहे, ज्यात बँक खासगीकरणाच्या विरोधातील आंदोलन तीव्र करण्याविषयी निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.

जमावबंदी असल्याने निदर्शने, धरणे नाही
संपकरी कर्मचाऱ्यांनी मुंबईतील चर्चगेट, सीएसएमटी, अंधेरी स्टेशनवर तीन ते चारच्या गटांत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून, बँक खासगीकरणाला विरोध व्यक्त करणारे मास्क लावून आपली भूमिका समजावून सांगणारी पत्रके प्रवाशांना वाटली. राज्यात सर्वत्र जमावबंदी असल्यामुळे नेहमीप्रमाणे धरणे, निदर्शने करण्यात आली नाहीत.
 

Web Title: Financial transactions hit due to strike of bank employees, participation of 50,000 bank officers and employees in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.