साळुंखे कुटुंबीयांना आर्थिक मदत
By Admin | Updated: April 29, 2016 04:14 IST2016-04-29T04:14:59+5:302016-04-29T04:14:59+5:30
बॅकेत वेतन खाते उघडताना, शहर पोलिसांनी दलातील सर्वच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा उतरविण्याची अट बँकेला घातली होती.

साळुंखे कुटुंबीयांना आर्थिक मदत
ठाणे : बॅकेत वेतन खाते उघडताना, शहर पोलिसांनी दलातील सर्वच पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अपघाती विमा उतरविण्याची अट बँकेला घातली होती. त्या योजनेतून मार्च महिन्यात अपघाती मृत्यू झालेल्या पोलीस नाईक चंद्रकांत साळुंखे यांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत मिळाली आहे. बुधवारी शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या हस्ते त्या रक्केमचा धनादेश साळुंखे यांच्या पत्नी किर्ती यांच्याकडे सुर्पूद केला. याप्रसंगी वाहतूक शाखेच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, बॅकेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
दारुच्या नशेत तर्रर होऊन बस वाहकाविना ठाणे महापालिक ा परिवहन सेवेची बस (टीएमटी) चालवून चालक गजानन शेजळू यांनी वाहतूककोंडी सोडविणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलीस नाईक ासह चौघांना धडक दिल्याची घटना घोडबंदर रोडवर ११ मार्च रोजी रात्री घडली. या घटनेत,साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले आहेत.याचदरम्यान, मार्च महिन्यात वेतन खाते एचडीएफसी बँकेत ठाणे पोलिसांकडून वेतन खाते उघडण्यात आली आहेत. तसेच अपघाती विम्याची घातलेल्या अटीमुळे बँकेकडून साळुंखे कुटुंबियांना ही मदत मिळाली आहे. या रक्कमेमुळे मोठा दिला मिळाले असून दोन्ही मुलांचे शिक्षण पूर्ण करता येणार असल्याची भावना किर्ती साळुंखे यांनी धनादेश मिळाल्यानंतर व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)