दीपक भातुसेमुंबई : अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्याकडे असलेले वित्तखाते वगळता उपमुख्यमंत्रिपद आणि उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण तसेच औकाफ ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे गेली. मात्र, वित्तखाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले. त्यानंतर वित्तखाते भाजपने राष्ट्रवादीकडून काढून घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, राष्ट्रवादीतील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या तीन ते चार महिन्यांत वित्तखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे येणार आहे.
अजित पवार यांची राज्याच्या वित्तविभागावर पकड होती. त्यांनी ११ वेळा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर वित्तविभाग मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवावा, असा निर्णय राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेअंतीच ठरला होता. आता अर्थ खाते पुन्हा सुपुर्द करण्याबाबत फडणवीस यांनी सुनेत्रा पवार यांच्याशीही चर्चा केली होती. यावेळी पार्थ आणि जय पवारही उपस्थित होते, असे असेही सुत्रांनी सांगितले.
पक्षाच्या अध्यक्षपदीही बिनविरोध निवड होणारउपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुढील पंधरवड्यात बिनविरोध निवड होईल. यासाठी पक्षात कोणाचाही विरोध नाही. उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच त्या पक्षाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळतील, असेही सूत्रांनी सांगितले.
Web Summary : The finance portfolio, currently held by CM Fadnavis, is expected to return to the NCP within three to four months. Sunetra Pawar is also likely to be elected unopposed as the national president of the NCP (Ajit Pawar faction).
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस के पास फिलहाल वित्त विभाग तीन से चार महीने में राकांपा को वापस मिलने की उम्मीद है। सुनेत्रा पवार को राकांपा (अजित पवार गुट) के राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में निर्विरोध चुने जाने की भी संभावना है।