अखेर व्यापाऱ्यांचा बंद मागे....
By Admin | Updated: July 14, 2016 04:13 IST2016-07-14T04:13:25+5:302016-07-14T04:13:25+5:30
फळे व भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातही नियमनमुक्त करण्यास शासनाने मान्यता दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली.

अखेर व्यापाऱ्यांचा बंद मागे....
मुंबई : फळे व भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातही नियमनमुक्त करण्यास शासनाने मान्यता दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी बंद मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे उद्यापासून अडत बाजार सुरू होणार असून फळ-भाज्यांची आवक वाढून किरकोळ विक्रीचे भाव खाली येतील. बाजार समित्यांत फळे-भाजीपाला नियमनमुक्त करताना शेतकऱ्यांकडून अडत न घेण्याला व्यापाऱ्यांनी सहमती दर्शविली आहे, अशी माहिती मंत्री देशमुख यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)
बाजार समित्यांमध्ये फळे-भाजीपाला नियमनमुक्त करताना शेतकऱ्यांना त्यांच्या पैशांची हमी, माथाडी कामगारांचे संरक्षण तसेच बाजार समित्यांचा देखभाल दुरु स्ती खर्च यांचा अभ्यास करून सुधारित अध्यादेश काढण्यात येणार आहे. या बैठकीत सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे व्यापाऱ्यांनी संप/बंद मागे घेतला असल्याची घोषणाही अशोक हांडे यांनी केली.
बाजार समितीच्या नियंत्रणातून फळे, भाजीपाला मुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्याविरोधात राज्यातील बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यापारी प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात बैठक झाली.